Agricultural University Agrowon
ताज्या बातम्या

Agricultural University : कुलगुरूंसह शास्त्रज्ञांशी फलोत्पादन मंत्र्यांचा संवाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मनी यांच्यासह मोसंबी, आंबा व इतर कृषी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांशी पालकमंत्री तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी सोमवारी (ता. ७) संवाद साधला.

Team Agrowon

औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (Agricultural University) कुलगुरू डॉ. इंद्र मनी यांच्यासह मोसंबी, आंबा व इतर कृषी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांशी पालकमंत्री तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी सोमवारी (ता. ७) संवाद साधला.

यावेळी आमदार हरिभाऊ बागडे व जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांची उपस्थिती होती. या वेळी वनामकृवीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी विद्यापीठातील सद्यःस्थिती व पुढील संशोधनाविषयीची दिशा याविषयी मंत्री भुमरे यांना अवगत केले. हिमायतबाग फळ संशोधन केंद्र औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील मोसंबी व कृषी संशोधन केंद्र यांनी केलेले संशोधनाबाबत यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.

फळ संशोधन केंद्र औरंगाबाद येथील आंबा व चिंचेचे विविध वाण व त्याची वैशिष्ट्य याबाबत हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एम. बी. पाटील यांनी माहिती सादर केली. मोसंबी पिकातील विविध समस्या व त्यावरील उपाय यावर मोसंबी संशोधन केंद्र बदनापूरचे प्रमुख डॉ. संजय पाटील सोयगावकर यांनी माहिती सादर केली. बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. डी. के. पाटील यांनी तूर, मूग व हरभरा या पिकांविषयी संशोधित केलेले विविध वाणांबाबत माहिती सादर केली.

तुरीचे बीडीएन ७११ हे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले आहे. महाराष्ट्रात जवळ जवळ 50 टक्के क्षेत्र हे या वाणाखाली असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली. बैठकीला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश अहिरे, कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण जाधव व इतर शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना ‘सॉइल हेल्थ कार्ड’चे वाटप

शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकता नेमकी किती हे सांगणारे ‘सॉइल हेल्थ कार्ड’ वाटप करण्यात आले. परंतु जमिनीमध्ये उत्पादनासाठी आवश्यक घटक कमी असल्यास त्याची पूर्तता कशाप्रकारे करायला हवी याविषयी सखोल माहिती अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे याविषयी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, संशोधन केंद्रे यांच्यासह संबंधित यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबविण्याची सूचना फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT