Sweet Potato Agrowon
ताज्या बातम्या

Sweet Potato Rate : रताळ्यांना उच्चांकी दर, महाराष्ट्रासह ५ राज्यात निर्यात

sandeep Shirguppe

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यासह सीमाभागात पावसाळी रताळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरम्यान चंदगड तालुक्यात रताळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने रताळी खरेदीला वेग आला आहे.

मलकापूर जातीच्या रताळीला प्रतिक्विंटल २५०० रुपये दर मिळाला आहे. तर जवारी रताळ्यांना १५०० रुपये दर मिळाला आहे. चंदगड तालुक्यातील सरोळी बाजार समितीमध्ये ईश्वर दत्तू पाटील, अर्जुन चौगुले यांच्या रताळ्यांना उच्चांकी दर मिळाला.

बेळगाव सीमाभागातील रताळी रुचकर आणि चविष्ट म्हणून गोवा, कर्नाटक आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. सीमाभागातून महाराष्ट्रसह उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब या राज्यातही रताळी जातात.

यंदा उन्हाळ्यातही रताळ्यांची मोठी लागवड केल्यामुळे बारा महिने रताळ्यांची कमी जास्त प्रमाणात आवक होत आहे. सध्या पावसाळी हंगामाला प्रारंभ झाला आहे. दर चांगला असल्याने रताळी उत्पादकांचा उत्साह देखील वाढला आहे.

यावेळी फेटा बांधून रताळी व्यापारी दत्ता पाटील यांनी सत्कार केला. यानंतर रताळी उत्पादकांच्या हस्ते रताळ्यांचे पूजन करण्यात आले. रताळी व्यापारी दत्ता पाटील, संजय खोराटे, प्रकाश मेलगे, सोमनाथ बोंद्रे, मावळू पाटील आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT