Rain Agrowon
ताज्या बातम्या

Hingoli Rain Update : हिंगोली जिल्ह्यातील ३ मंडलांत अतिवृष्टी

Hingoli Monsoon Update : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत दिवसभराच्या उघडिपीनंतर गुरुवारी (ता. २०) रात्री सर्वदूर पाऊस सुरू झाला.

Team Agrowon

Parbhani Rain News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत दिवसभराच्या उघडिपीनंतर गुरुवारी (ता. २०) रात्री सर्वदूर पाऊस सुरू झाला. या दोन जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. २१) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत सर्व ८२ मंडलांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातील ३ मंडलांत अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यात सरासरी १४ मिलिमीटर, तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी ३२.७ मिलिमीटर पाऊस झाला. शुक्रवारी (ता. २१) दुपारनंतर देखील पाऊस सुरू होता.

हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नाले, ओढे तसेच कयाधू नदीला पूर आला. सखल भागात पाणी साचून राहिल्याने पिके पाण्याखाली गेली. बांध, बंधारे फुटल्याने माती सोबत पिके वाहून गेली. शेत, गाव रस्ते खचले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक मंडलांत मेघगर्जना, वेगाच्या वाऱ्यासह पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलांत अत्यंत हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी, जिंतूर, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील अनेक मंडलांत पावसाचा जोर राहिला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १४ मिलिमीटर,जुलै महिन्यात आजवर सरासरी १५२.६ मिलिमीटर, तर १ जूनपासून एकूण सरासरी २०८.१ मिलिमीटर (७०.८ टक्के) पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडलांत शुक्रवारी (ता. २१) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते मुसळधार पाऊस झाला.

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ९४.५ मिलिमीटर, वसमत तालुक्यातील टेंभुर्णी ७८.८ मिमी, औंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव ८५.८ मिलिमीटर या तीन मंडलांत अतिवृष्टी झाली.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ३२.७ मिमी, जुलै महिन्यात आजवर २३१.९ मिलिमीटर तर १ जूनपासून एकूण सरासरी २७७ मिलिमीटर (८५.२ टक्के) पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Procurement: राज्यात ७.६१ लाख टन हरभरा खरेदीला मंजुरी

Vidarbha Irrigation Update: शासन लेखी विदर्भातील सिंचन अनुशेष संपुष्टात

Kidney Trafficking: किडनी तस्करी रॅकेटमधील आरोपींना ‘मकोका’ लावा

Irrigation Subsidy Issue: मराठवाड्याला अनुशेष अनुदानाचा वाटा कमीच

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा चटका वाढणार

SCROLL FOR NEXT