Flood Agrowon
ताज्या बातम्या

Sindhudurg Rain: सिंधुदुर्गात पुन्हा मुसळधार

Sindhudurg Rain Update : आंबोली, करूळ घाटांत दरडी कोसळण्याचे घटना घडल्या आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता.२२) रात्री दोन वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

आंबोली, करूळ घाटांत दरडी कोसळण्याचे घटना घडल्या आहेत. याशिवाय तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली असून अन्य नद्यांदेखील इशारा पातळीनजीक आहेत.

जिल्ह्यात पाच-सहा दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर शुक्रवार (ता.२१) दिवसभर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. त्यामुळे काही अंशी नदीनाल्यांच्या पाणीपातळीत सायकांळी उशिरा घट झाली होती.

मात्र रात्री दोन वाजल्यापासून जिल्ह्यात सर्वत्र पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सरीवर सरी कोसळत असल्यामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. आंबोली घाटात शुक्रवार (ता.२१) रात्री दरड कोसळली. दरड हटविण्याचे काम बांधकाम विभागाकडून सुरू आहे.

तर शनिवारी पहाटे करूळ घाटात दरड कोसळली. ती दरड देखील हटविण्यात आली आहे. कणकवली-आचरा मार्गावर फणसवाडी येथे पुन्हा रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

बांदा-बावळट मार्गावर पुन्हा पुराचे पाणी आल्यामुळे हा मार्ग देखील वाहतुकीस बंद झाला आहे. जिल्ह्यातील तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. गडीनदी इशारापातळीनजीक पोहोचली आहे. तिलारी प्रकल्पातून विसर्ग सुरू झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT