Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस

Sindhudurg Monsoon Update : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी असल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Sindhudurg Rain News : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील देवगड, वेंगुर्ला आणि मालवण तालुक्यांना पावसाने अक्षरक्ष झोडपून काढले आहे.

शेतमळ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येत आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान देवगड तालुक्यात सर्वाधिक १८८ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्याच्या काही भागांत मंगळवारी (ता. ४) जोरदार पाऊस झाला. तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. मात्र बुधवारी (ता. ५) पहाटेपासून जिल्ह्याच्या सर्वच भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. पावसामुळे शेतमळे तुडुंब भरून वाहत आहेत.

नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. जिल्ह्यातील गडनदी, जानवली, कर्ली, तिलारी, शुकनदी या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे पावसाचा जोर असाच राहिल्यास जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

पाणथळ जमिनीतील भातरोपे पुनर्लागवड थांबवून शेतकऱ्यांनी वरकस जमिनीतील लागवडीला सुरुवात केली आहे. दुपारी उशिरापर्यंत जिल्ह्याच्या सर्वच भागांत मुसळधार पाऊस सुरू होता.

जिल्ह्यातील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला या किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहिला आहे. तीन तालुक्यांमध्ये १०० मिलिमिटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) : देवगड-१८८ , मालवण -१२२.४, सावंतवाडी- ७७.१, वेंगुर्ला -१०५.२, कणकवली - ६१.२, कुडाळ-९०.५, वैभववाडी-५५.३, दोडामार्ग -५५.९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT