Nashik Rain Agrowon
ताज्या बातम्या

Nashik Rain : मालेगाव, देवळा तालुक्यात जोरदार सरी

Rain Update : आर्द्रा नक्षत्रामध्ये जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या भागात शेतीकामांना गती आली आहे.

Team Agrowon

Nashik News : आर्द्रा नक्षत्रामध्ये जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या भागात शेतीकामांना गती आली आहे. मात्र पूर्व भागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यातच सोमवारी (ता.३) व मंगळवारी (ता.४) सलग दोन दिवस पावसाने उघडी दिली.

अशातच मंगळवार (ता.४) नंतर मालेगाव व देवळा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. तर इतर तालुक्यात हलका पाऊस झाला. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. बुधवारी (ता. ५) देवळा तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

कसमादे मालेगाव, देवळा तालुक्यातील पावसाचा जोर दिसून आला. अनेक ठिकाणी शिवारात पाणी साचले. मात्र समाधानकारक पाऊस अद्याप नसल्याची स्थिती आहे. मालेगाव तालुक्यातील निमगाव, कौळाणे, करंजगव्हाण, वडनेर, कळवाडी महसूल मंडळात माध्यम पाऊस झाला.

तर मालेगाव शहर परिसरात हलका पाऊस झाला. देवळा तालुक्यातील उमराणे महसूल मंडळात पावसाचा जोर दिसून आला. तर देवळा मंडळात मध्यम, तर लोहनेर मंडळात हलका पाऊस झाला.

नांदगाव तालुक्यातील नांदगाव, वेहेळगाव, हिसवळ महसूल मंडळात मध्यम, मनमाड व जातेगाव महसूल मंडळात हलका, तर येवला तालुक्यातील आंदरसूल महसूल मंडळात माध्यम, नगरसुल, पाटोदा, सावरगाव, जळगाव महसूल मंडळात हलका पाऊस झाला.

पश्चिम पट्ट्यात जोर कमी

पेठ तालुक्यात पावसाने उघडीप झाली. तर सुरगाणा तालुक्यातील बोरगाव महसूल मंडळात हलक्या सरी बरसल्या. तर तालुक्यात पावसाचा हलकासा शिडकावा झाला. नाशिक, दिंडोरी, कळवण, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाड, सिन्नर, चांदवड तालुक्यात हलका पाऊस आहे.

पेरणीयोग्य पावसाची गरज

जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस पडलेल्या पश्चिम घाट विभाग, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण या भागात कापूस, सोयाबीन, तूर, मूग आदी खरीप पिकाची पेरणी सुरु ठेवावी. तसेच पूर्वेकडील अवर्षण प्रवण व मैदानी विभाग जसे सिन्नर, येवला, नांदगाव,मालेगाव, चांदवड, नाशिक व निफाड तालुक्यात खरीप पिकांची पेरणी ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी, असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान केंद्रातर्फे देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT