Ashadhi Wari Agrowon
ताज्या बातम्या

Ashadhi Wari 2023 : महिला वारकऱ्यांसाठी आरोग्य वारी उपक्रम

Palkhi Sohala 2023 : आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो महिला वारकऱ्यांच्या आरोग्य स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाकडून ‘आरोग्य वारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Pune News : आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो महिला वारकऱ्यांच्या आरोग्य स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाकडून ‘आरोग्य वारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या बाबत आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी माहिती दिली.

वारी काळात दर दहा ते वीस किलोमीटर अंतरावर महिलांसाठी शौचालय व न्हाणीघराची व्यवस्था असावी. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशिन आवश्यक, स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, महिला सुरक्षिततेकरिता महिला हेल्पलाइन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी, मंदिर परिसरात दर्शनी भागात लावावेत, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करून द्यावा, पालखी सोहळ्यासाठी निर्भया पथक तैनात करण्यात यावे आदी सूचना आयोगाने प्रशासनाला केल्या आहेत.

या बाबत पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा प्रशासनासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या वेळी आयोगाच्या सदस्य गौरी छाब्रिया, सदस्य सचिव श्रद्धा जोशी यांच्यासह तिन्ही जिल्ह्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्हा प्रशासनाने महिला वारकऱ्यांसाठी १,२९० फिरती स्वच्छतागृहे व १२ शाळांमध्ये न्हाणीघराची व्यवस्था केली आहे.

स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध असून, ३० ठिकाणी निवारा कक्ष आहेत. सोलापुरात दर दीड किलोमीटर अंतरावरील निवारा कक्षात निर्भया पथक गस्त घालणार आहे, ४० ठिकाणी हिरकणी कक्ष, २५ डॉक्टरांचे पथक अशा सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT