Aashadhi Wari 2023 Agrowon
ताज्या बातम्या

Aashadhi Wari 2023 : आरोग्य शिबिरातून वारकऱ्यांच्या सेवेची संधी

Wari 2023 : राज्यातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी शासनामार्फत अनेक योजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. पंढरपूरच्या आषाढी यात्रेत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वारकऱ्यांची आरोग्य सेवा करण्याची संधी मिळाली.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Heath Champ: पंढरपूर, जि. सोलापूर ः राज्यातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी शासनामार्फत अनेक योजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. पंढरपूरच्या आषाढी यात्रेत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वारकऱ्यांची आरोग्य सेवा करण्याची संधी मिळाली.

आरोग्य विभागाने या संधीचे सोने करत वारकऱ्यांप्रती असलेले आपले उत्तरदायित्व निभावले आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी वाखरी येथील महाआरोग्य शिबिराच्या उद्‌घाटन प्रसंगी केले.

आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे वाखरी, ६५ एकर आणि गोपाळपूर या तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून वाखरी येथे शिबिराचे उद्‌घाटन आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी खासदार हेमंत पाटील, तेलंगणचे आमदार मुघरामजी दयानंद व श्री. मैनवपल्ली, आरोग्य सेवा संचालक डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक आर. डी. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, नोडल अधिकारी डॉ. धर्मेंद्रकुमार उपस्थित होते.

आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले, राज्य शासनाने स्त्रीशक्ती आणि मातृशक्तीचा नेहमीच सन्मान केला आहे. राज्यातील महिला निरोगी राहाव्यात यासाठी माता सुरक्षित घर सुरक्षित हे अभियान राबवून या अभियानात सुमारे चार कोटी ३९ लाख महिलांची तपासणी केली.

जागरूक पालक सदृढ बालक या अभियानातही आरोग्य विभागाने चांगले काम केले आहे. आता आरोग्य विभागामार्फत १८ वर्षांवरील सर्व पुरुषांची तपासणी करण्यासाठी अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार शिंदे म्हणाले, ‘आरोग्य वारी पंढरीच्या दारी’ या घोषवाक्यासह आरोग्य विभागाने वारकऱ्यांना सेवा देण्याचे काम केले आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून शासनाने गेल्या वर्षभरात अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले.

पंढरपूरच्या आषाढी वारीत वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री स्वतः नियमित आढावा घेत आहेत, असेही खासदार श्री. शिंदे म्हणाले.

राज्य शासनाने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेला प्राधान्य दिले. आषाढी वारीमध्ये आयोजित केलेले महाआरोग्य शिबिर एक नावीन्यपूर्ण उपक्रम ठरेल यात शंका नाही, असा विश्वास खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला.

प्रा. शिवाजी सावंत यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या घोषवाक्यासह आरोग्य विभाग या शिबिराच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेत कार्यरत असल्याचे सांगितले.

१० लाख वारकऱ्यांची तपासणी करणार शिबिर २७ ते २९ जून या कालावधीत २४ तास चालू राहणार आहे. शिबिरामध्ये १० लाख लोकांची मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार व गंभीर आजाराच्या रुग्णाकरिता महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जनआरोग्य योजना अंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालयामध्ये संदर्भ सेवा देऊन मोफत उपचार, शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT