Zilla Parishad Agrowon
ताज्या बातम्या

Nashik ZP : निधी नियोजन बैठकीत विभागप्रमुखांची झाडाझडती

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी निधी खर्चासंबंधित बोलाविलेल्या बैठकीत विभाग प्रमुखांकडे झालेल्या निधी खर्चाचा तपशील नसल्याचे समोर आले.

Team Agrowon

नाशिक : जिल्हा परिषद (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी निधी खर्चासंबंधित बोलाविलेल्या बैठकीत विभाग प्रमुखांकडे झालेल्या निधी खर्चाचा तपशील नसल्याचे समोर आले. त्यावर मित्तल यांनी विभागप्रमुखांना थेट माहिती घेऊन बैठकीला उपस्थित राहण्याचे फर्मान सोडले. या प्रकारावरून मित्तल यांनी विभागप्रमुखांची झाडाझडतीही घेतली. दरम्यान, निधी २०२२ या आर्थिक वर्षातील निधी खर्चासाठी जानेवारी २०२३ चा अल्टिमेटम या वेळी मित्तल यांनी विभागप्रमुखांना दिला.

मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. २९) निधी खर्च आढावा बैठक झाली. बैठकीस अनेक विभागप्रमुख वेळेत उपस्थित नसल्याने मित्तल यांनी नाराजी व्यक्त केली. बैठक सुरू झाल्यानंतर विभागप्रमुख बैठकीस दाखल झाले. बैठकीत प्रत्येक विभागास आतापर्यंत झालेला खर्चाची माहिती मित्तल यांनी विचारली.

; मात्र, अनेक विभागप्रमुखांकडे आपल्याच विभागात प्राप्त झालेला निधी व झालेला खर्च, टक्केवारी यांची माहिती नव्हती. त्यावर मित्तल चांगल्याच संतापल्या. त्यांनी माहिती नसणाऱ्या विभागप्रमुखांना माहिती घेऊन बैठकीस हजर राहण्याचे फर्मान काढले. त्यांनतर विभागप्रमुखांनी धावपळ करत माहिती गोळा करत बैठकीस उपस्थिती लावली.

निधी अखर्चिक राहता कामा नये

प्रत्येक विभागात झालेल्या खर्चाचा मित्तल यांनी सविस्तर आढावा घेतला. यात बांधकामासह काही विभागाचा खर्च कमी असल्याचे दिसून आले. त्यावर, मित्तल यांनी संबंधित विभागांना विचारणा केली. प्राप्त निधी वेळात खर्च होणे गरजेचे आहे. जानेवारी २०२३ अखेर २०२१-२२ या आर्थिक वर्षातील निधी खर्च झाला पाहिजे, असे नियोजन करण्याबाबत सांगितले. २०२२-२३ या आर्थिक वर्षातील नियोजन करून त्यास मान्यता द्यावी, कार्यारंभ आदेश द्यावेत अशा, सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT