Morcha Agrowon
ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : फडणवीस यांच्या भूमिकेविरूद्ध हमाल, माथाडी कामगारांचा मोर्चा

हमाल माथाडी कायद्याच्या तरतुदीनुसार माथाडी प्रा फंड नियमात बदल करावा. माथाडी मंडळाच्या लेव्हीमध्ये वाढ करून ४० टक्के करावा आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

Team Agrowon

परभणी ः माथाडी मंडळाची कामगार विरोधी धोरणे तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हमाल कामगार विरोधी भूमिकेच्या निषेधार्थ बुधवारी (ता.१८) परभणी येथील माथाडी मंडळावर मराठवाडा हमाल- माथाडी मजदूर युनियन (लाल बावटा) तर्फे मोर्चा (Hamal Morcha) काढण्यात आला.

गृहमंत्री व महसूल मंत्री यांच्या कामगार विरोधी वक्तव्याचा निषेध करावा, याबद्दल शासनाच्या कामगार विभागाने तत्काळ स्पष्टीकरण द्यावे, सर्व नोंदणीकृत कामगारांना फंडाची पासबुके तत्काळ अदा करावीत, दरमहा हिशोबाची तरतूद करा, दरमहा वेतन वेळेवर अदा करावे.

दरमहा १० तारखेपूर्वी वेतन अदा करावे, परभणी जिल्ह्याच्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, वखार महामंडळे, जिंनिग, साखर कारखाने, नाफेड खरेदी केंद्रे, हमीभाव खरेदी केंद्रे, गुड्स शेड, खासगी गोदामे येथे माथाडी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी.

हमाल माथाडी कायद्याच्या तरतुदीनुसार माथाडी प्रा फंड नियमात बदल करावा. माथाडी मंडळाच्या लेव्हीमध्ये वाढ करून ४० टक्के करावा आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

युनियनचे अध्यक्ष कॉ. शेख अब्दुल, सरचिटणीस कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT