Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : गारपिटग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदानासाठी उपोषण

Team Agrowon

नांदेड : मागील वर्षी बिलोली तालुक्यातील काही गावांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व जोरदार गारपीट होऊन रब्बी हंगामातील (Rabi Season) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे होऊन देखील अद्यापही त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची आर्थिक मदत मिळाली नाही. ती तत्काळ वाटप करावी, अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्यामुळे बुधवार (ता. १४)पासून तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

गतवर्षी २९ डिसेंबर रोजी बिलोली तालुक्यातील सगरोळी, शिंपाळा, दौलतापूर, हिप्परगा थडी, रामपूर थडी, जलालपूर, केसराळी, खतगाव मिनकी, मुतन्याळ या भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करण्यात आले. तसेच त्या नुकसानग्रस्त बाधीत शेतकऱ्यांची नावे अनुदानित रकमेसह गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्या त्या गावांत तलाठ्या मार्फत याद्याही प्रसिद्धी करण्यात आल्या. परंतु अद्यापही त्या बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा झाले नसल्याने प्रत्येक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.

अनुदानासंबंधी तहसील कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. त्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रांत अध्यक्ष राजू पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणात जिल्हाध्यक्ष शंकरराव मावलगे, आत्माराम देगावे, संभाजी नरवाडे, ईश्‍वर जाहुरे आदी सहभागी झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT