Department of Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department : तंत्रशुद्ध शेतीविषयी संवादासह शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Shetakari Samvad : दिवसभरात तालुक्यातील चार ठिकाणी कृषी विभाग, आत्मा व जिल्हा विज्ञान केंद्राच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात संवाद

Team Agrowon

Dhule News : जिल्हा कृषी विभाग, आत्मा व जिल्हा कृषी विज्ञान केंद्रातर्फे काळगाव, म्हसदी, ककाणी व भडगाव (ता. साक्री) शिवारात जिल्हा मासिक चर्चासत्र व शिवारक्षेत्र भेटीदरम्यान तंत्रशुद्ध शेतीविषयी संवाद साधत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. दिवसभरात तालुक्यातील चार ठिकाणी कृषी विभाग, आत्मा व जिल्हा विज्ञान केंद्राच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात संवाद साधला.

काळगाव शिवारात नितीन ठाकरे यांच्या शेतात डाळिंब, शेवगा, म्हसदीत भटू नामदेव बेडसे यांच्या शेतात सीताफळ, पपई, ककाणीत गोरख बेडसे यांच्या शेतात डाळिंबासह भाजीपाला, तर भडगाव येथे भटू विक्रम बेडसे यांच्या शेतात काकडी, जांभूळ, सीताफळ लागवडीची पाहणी करण्यात आली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, आत्माचे प्रकल्प संचालक एन. एम. कोळपकर, उपविभागीय कृषी अधिकारी बापूसाहेब गावित, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) विनय बोरसे, काळगावचे लोकनियुक्त सरपंच संजय भामरे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. पंकज पाटील, जगदीश काथेपुरे, धुळे तालुका कृषी अधिकारी वाल्मीक प्रकाश, शिरपूर तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत साठे, शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी नवनाथ साबळे, साक्री तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

काळगाव शिवारात युवा शेतकरी नितीन ठाकरे यांनी चर्चासत्रात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. डाळिंब बागेसाठी ॲगलिंग पद्धतीने, बांधणी कशी योग्य आहे तसेच नेटच्या वापरामुळे पिकाचे तेल्यारोग नियंत्रण, अवकाळी पाऊस, गारपिटीपासून मुक्त करण्यासाठी, उन्हामुळे फळांवर डाग पडू नये, संरक्षण, आंबेबहाराच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठी क्रॉप कव्हरचा वापर करावा, असे आवाहन चर्चासत्रात करण्यात आले.

सीताफळात फळमाशी, पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी ट्रॅपचा वापर करत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. ककाणीत गोरख बेडसे यांच्या डाळिंबाच्या बागेत फळांना आकर्षक रंगाच्या फळांची पाहणी करण्यात आली.

म्हसदी शिवारात भटू नामदेव बेडसे यांच्या शेतात सीताफळ व पपई पिकाची पाहणी करण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी मार्गदर्शन केले. सीताफळ लागवडीसाठी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या वाणांचा वापर करावा, असे आवाहन केले. डॉ. पंकज पाटील, जगदीश काथेपुरे यांनीही मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Heavy Rain: मुसळधार पावसाने झोडपले; धरणांतून विसर्ग

Legislature Adjourned: विधिमंडळाचे कामकाज काही मिनिटांतच तहकूब

Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

Maharashtra Agriculture Sowing: राज्यात ३९ टक्के पेरण्या पूर्ण

Monsoon Disaster: बारा जणांचे मृत्यू सुलतानी कारभारामुळे; काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT