Dada bhuse Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : पालकमंत्री भुसे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा बांधावर

निफाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चांदोरी येथील शेतीची पाहणी शुक्रवारी (ता. १०) भुसे यांनी केली.

Team Agrowon

Nashi News नाशिक : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे (Unseasonal Rain) नुकसान झालेल्या (Crop Damage) भागाचे तातडीने पंचनामे (Crop Damage Survey) करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री दादाजी भुसे (Dada Bhuse) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

निफाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चांदोरी येथील शेतीची पाहणी शुक्रवारी (ता. १०) भुसे यांनी केली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

भुसे म्हणाले, की अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याबाबत कृषी विभागाने खबरदारी घ्यावी.

शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असेही भुसे यांनी सांगितले. निफाड तालुक्यातील चांदोरी येथील बाळासाहेब हिंगोले, गणपत हिंगोले यांच्या द्राक्ष बागांची व बाळासाहेब घोरपडे यांच्या गव्हाच्या शेतीची पाहणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!

Inspirational Story: गावाच्या पाणी प्रश्‍नासाठी झगडणारा सुनील

Crop Damage Compensation GR: चार जिल्ह्यांतील २२ हजार शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी १६ कोटी मदत मंजूर

Krishna River: कृष्णा नदीत रविवारपर्यंत उपसाबंदी

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

SCROLL FOR NEXT