Water Management Agrowon
ताज्या बातम्या

Water Management : जिल्ह्याचा भूजल व्यवस्थापन आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर

केंद्रीय भूमी जल बोर्डाच्या वतीने तयार करण्यात आलेला पुणे जिल्ह्याचा भूजल व्यवस्थापन आराखडा बोर्डाच्या पुणे येथील राज्य कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सादर केला.

टीम ॲग्रोवन

पुणे ः केंद्रीय भूमी जल बोर्डाच्या (Bhumi Jal Board) वतीने तयार करण्यात आलेला पुणे जिल्ह्याचा भूजल व्यवस्थापन आराखडा (Ground Water Management Plan) बोर्डाच्या पुणे येथील राज्य कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांना सादर केला. भूजल व्यवस्थापन (Water Management) आराखड्यात सुचविलेल्या उपाययोजनांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोर्डाचे वैज्ञानिक आणि प्रभारी अधिकारी डॉ. जे. देविथुराज, वैज्ञानिक सूरज वाघमारे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संतोष गावडे, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या उपअधीक्षक अभियंता अंजली काकडे, कुकडी पाटबंधारे मंडळाच्या उपअधीक्षक अभियंता श्वेता पाटील, जिल्हा परिषद छोटा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग कांजाळकर, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे भूवैज्ञानिक प्रकाश बेडसे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बोर्डाने केलेला आराखडा पाटबंधारे विभाग, जीएसडीए, लघू पाटबंधारे, कृषी विभाग आदी शासकीय विभागांबरोबरच साखर कारखाने, कृषी विज्ञान केंद्र यांनाही उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. ते म्हणाले, की भूजल हा व्यापक चर्चेचा विषय असून, त्याविषयी जास्तीत जास्त जनजागृती करण्याची गरज आहे.

भूजलपातळीतील घट रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. पावसाचे पाणी जिरविण्यासाठी क्रॉस ड्रेनेजची तसेच पाझर तलावांची सुमारे दीड हजार कामे आराखड्यामध्ये सुचवण्यात आली आहेत. ही कामे भूजल पातळीवाढीसाठी उपयुक्त ठरतील. या कामांचा प्राथमिक आराखडा करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT