Mahatma Phule Jayanti Agrowon
ताज्या बातम्या

Mahatma Phule Jayanti : महात्मा फुले जयंतीनिमित्त पालकमंत्र्यांचे अभिवादन

महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. ११) गंजपेठेतील फुले वाड्यातील जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला विविध सामाजिक, राजकीय संस्था संघटना, पक्षाच्या नेते कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.

Team Agrowon

Pune News : महात्मा जोतिराव फुले (Mahatma Jotirao Phule Jayanti) यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. ११) गंजपेठेतील फुले वाड्यातील जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला विविध सामाजिक, राजकीय संस्था संघटना, पक्षाच्या नेते कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.

या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले यांना अभिवादन केले.

माजी आमदार दीपक पायगुडे, बाळासाहेब आमराळे, हेमंत रासने, गणेश बिडकर आदी उपस्थित होते. या वेळी शहर आणि जिल्ह्यांतून आलेल्या विविध नागरिकांनी फुले दांपत्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या वेळी फुले वाड्यात फुलेलिखित पुस्तकांच्या स्टॉलवर नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.

अभिवादनकर्त्या १ लाख नागरिकांना मिसळ

दरम्यान पाटील यांनी फुले यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या १ लाख नागरिकांसाठी मास्टर शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते मिसळ बनविण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ केला. या वेळी उपस्थित नागरिकांनी मोफत मिसळचा आस्वाद घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT