Vineyard Management  Agrowon
ताज्या बातम्या

Vineyard Management : सांगलीतील द्राक्ष एप्रिल खरड छाटणी अंतिम टप्प्यात

Grape Cultivation : पुढील हंगामातील घडांची निर्मिती आणि फाद्यांची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी द्राक्षाची खरड छाटणी केली जाते. खरड छाटणीसाठी परराज्यांतून सुमारे २० हजार मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

Team Agrowon

Sangli News :पुढील हंगामातील घडांची निर्मिती आणि फाद्यांची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी द्राक्षाची खरड छाटणी (Grape Pruning) केली जाते. खरड छाटणीसाठी परराज्यांतून सुमारे २० हजार मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

यंदा द्राक्षाची खरड छाटणी मार्च महिन्यात सुरू झाली आहे. आतापर्यंत ७० ते ८० टक्क्यांपर्यंत खरड छाटणी उरकली असून, उर्वरित छाटणी लवकरच पूर्ण होईल.

सांगली जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र १ लाख ३० हजार एकर इतके आहे. जत तालुक्यासह पलूस तालुक्यातील काही भागांत अद्यापही अजून १० ते १५ टक्के द्राक्ष काढणी शिल्लक आहे. यंदा द्राक्ष खरड छाटणीसाठी स्थानिक मजुरांसह नाशिक, बिहार, उत्तर प्रदेश या ठिकाणाहून मजूर आले आहे.

मार्च महिन्याच्या मध्यावर द्राक्षाचा हंगाम संपण्यास प्रारंभ होते. त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून द्राक्षाच्या खरड छाटणीस सुरुवात होते. त्यानुसार राज्यासह परराज्यांतून खरड छाटणी मजूर दाखल होतात.

मात्र गेल्या वर्षी फळ छाटणीवेळी पाऊस झाल्याने द्राक्ष फळ छाटणी एकाच वेळी झाली. त्यामुळे हंगामही उशिरा सुरू झाला. परिणामी, द्राक्षाचा हंगाम उशिरा संपण्यास सुरुवात झाली.

हंगाम संपण्यापूर्वीच जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी खरड छाटणीचे नियोजन सुरू केले होते मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यासह परराज्यांतील मजूर खरड छाटणी जिल्ह्यात दाखल झाले. यंदाच्या खरड छाटणीसाठी नव्या जोमाने पुढे आला असून, पुन्हा नव्या उमेदीने पुढील वर्षाच्या द्राक्ष हंगामासाठी सज्ज झाला आहे.

जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम उशिरा संपला. त्यामुळे खरड छाटणी उशिरा प्रारंभ झाली. पलूस, जत या भागात द्राक्ष काढणी शिल्लक आहे. इतर भागांतील द्राक्ष खरड छाटणी अंतिम टप्प्यात आली आहे.

- विनायक पाटील, द्राक्ष उत्पादक शेतकरी, वायफळे, ता. तासगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT