Grape Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Grape Crop Damage : ‘वादळी’ने सांगोल्यातील द्राक्ष उत्पादक अडचणीत

सांगोला तालुका डाळिंबाची कोठार म्हणून ओळखला जात होता. परंतु याच कोठाराला मर रोगाचा प्रादुर्भाव लागला आणि मोठ्या प्रमाणात डाळिंबाला उध्वस्त झाल्या.

Team Agrowon

Solapur News एकीकडे बाजारपेठेत द्राक्षांना (Grape Rate) म्हणावा तसा भाव मिळत नसताना शेतकरी त्रस्त होते. त्यातच गेली दोन दिवस झाले वादळी पावसाच्या (Unseasonal rain) धारांनी द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात मात्र चांगलेच पाणी आणले आहे.

सांगोला तालुका डाळिंबाची कोठार म्हणून ओळखला जात होता. परंतु याच कोठाराला मर रोगाचा प्रादुर्भाव लागला आणि मोठ्या प्रमाणात डाळिंबाला उध्वस्त झाल्या. या रोगामुळे अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब बागा काढून टाकल्याने शेतकरी नगदी पिकांसह द्राक्षांकडे वळला होता.

गेले दोन-तीन वर्षापासून तालुक्यातील बहुतांश भागात द्राक्ष बागांची लागवड झाली. गेल्या वर्षी अवकाळीने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. विक्रीसाठी द्राक्षाचे बागा मोठ्या प्रमाणात परिपक्व झाले आहेत. काहींनी बेदाणे तयार करण्यासाठी द्राक्ष शेडवरही टाकले आहेत.

परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व काही भागात झालेल्या पावसामुळे या द्राक्षबागांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. एकीकडे द्राक्ष बागांना म्हणावा तसा भाव शेतकऱ्यांना मिळत नाही,

त्यातच वादळी पावसाच्या धारा पडल्याने द्राक्षांचे मणीगळ, द्राक्ष घड फुटणे, बेदाने काळे पडणे असे प्रकार होत असल्याने व्यापारी अधिकच कवडीमोल भावाने द्राक्ष खरेदी करू लागले आहेत.

व्यापाऱ्यांची खरेदीकडे पाठ

यावर्षी द्राक्षांना म्हणावा तसा भाव मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यातच वादळी पावसाचे कारण पुढे करत व्यापारी कमी भावाने द्राक्षबागा खरेदी करू लागले आहेत. व्यापारी फक्त चांगला माल खरेदी करीत आहेत.

त्यामुळे मध्यम स्वरूपाच्या द्राक्ष बागांकडे व्यापारी पाठ फिरवत आहेत. त्यातच अवकाळीच्या थोड्याशा पावसानेही व्यापारी खरेदीचा भाव कमी करू लागले आहेत.

अवकाळीमुळे ११५ -१२० रुपयांनी (प्रति चार किलो पेटी) खरेदी केलेली द्राक्ष व्यापारी सध्या शेतकऱ्यांकडून ६० -८० रुपयांनी (प्रति चार किलो पेटी) मागू लागला आहे.

वादळीच्या झालेल्या हलक्या पावसाने द्राक्ष घडातील मनी काळे पडल्याने व्यापारी माल खरेदी करण्यासाठी टाळाटाळ करू लागले आहेत. सध्या बागेच्या केलेला खर्चही निघणार नाही
- प्रभाकर खंडागळे, द्राक्ष उत्पादक, संगेवाडी, ता. सांगोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT