Onion Market  Agrowon
ताज्या बातम्या

Onion Market : कांदाप्रश्‍नी सरकार असंवेदनशील ः सुप्रिया सुळे

Supriya Sule : केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदाप्रश्‍नी बोलाविलेल्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातून एकही जबाबदार मंत्री आणि नेते गेले नाहीत.

Team Agrowon

Pune News : केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदाप्रश्‍नी बोलाविलेल्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातून एकही जबाबदार मंत्री आणि नेते गेले नाहीत. यामुळे कांदा प्रश्‍नाकडे पाहण्याचा राज्य शासनाचा दृष्टिकोन अतिशय उदासीन आणि असंवेदनशील आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करत सुळे यांनी याबाबत ट्विट केले असून, कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी ही बैठक अतिशय महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे.

या बैठकीसाठी महाराष्ट्रातील प्रमुख कांदा उत्पादक शेतकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राज्यातील प्रमुख मंत्री यांना बैठकीसाठी आमंत्रित केले की नाही याचे उत्तर राज्य सरकारने देणे आवश्यक आहे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे.

वास्तविक केंद्र शासनाच्या असंवेदनशील धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कांदा उत्पादकांची बाजू केंद्र सरकारसमोर मांडण्यासाठी महाराष्ट्रातील जबाबदार मंत्र्यांनी या बैठकीला जाणे आवश्यक होते.

परंतु बैठकीला त्यांची उपस्थित नसणे यावरून राज्य सरकार शेतकऱ्यांप्रती किती असंवेदनशील आहे, हे दिसून येते, असा आरोपही सुळे यांनी केला आहे. बैठकीला आमंत्रित करूनही बैठकीला गेले नाहीत, यावरून या बैठकीकडे राज्य शासनाचा पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय उदासीन आणि असंवेदनशील आहे हे स्पष्ट आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT