Rain Update
Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Maharashtra Rains: जुलै महिन्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस; माणिकराव खुळे यांचा अंदाज

टीम ॲग्रोवन

बुधवार (ता. ६ जुलै) पासून महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याचा अंदाज (Rain Prediction) आहे; जुलै महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असे मत निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केले. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Weather Department) जुलैमध्ये देशभरात सरासरीच्या तुलनेत ९४ ते १०६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज (Rain Forecast) नुकताच वर्तवला आहे.

माणिकराव खुळे म्हणाले, ‘‘जुलै महिन्यात महाराष्ट्रात मॉन्सूचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडण्याची शक्यता ४५ टक्के जाणवते. ' ला निना' हा घटक संपूर्ण पावसाळ्यात कार्यरत आहे. ही देशासाठी जमेची बाजू दिसत असली तरी ' भारतीय महासागर द्वि-ध्रुविता(आयओडी) ' मात्र संपूर्ण पावसाळ्यात नकारात्मकतेकडे झेपावत आहे. पावसासाठी ही एक प्रतिकूल बाब जाणवत आहे. त्यामुळे कमी पाऊस व पावसाचे खंडही जाणवू शकतात. अर्थात हे संपूर्ण देशभरातील पाऊस वितरणासाठी लागू आहे.''

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार होईल. त्याच्याशी निगडित परिणामामुळे पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात चांगल्या पावसास सुरवात होऊ शकते, असे खुळे यांनी सांगितले. मुंबईसह कोकण व गोव्यात दमदार पाऊस चालू आहे. तिथे पाऊस कायम राहणार आहे. मोसमी पावसाच्याया एक अरबी समुद्रीय शाखेसाठी म्हणजेच मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील पश्चिमकडील ४ जिल्ह्यांसाठी सध्या तरी ही उत्तमच अनुकूलता समजावी, असे खुळे म्हणाले.

संपूर्ण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, मोहोळ, माढा, बार्शी, करमाळा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, पारनेर ह्या व सभोवतालच्या भागात सध्या तरी काहीशा विखुरलेल्या स्वरूपातच मध्यम पाऊस होण्याची शक्यता दिसते. नैऋत्य मॉन्सूनने साधारणपणे ८ जुलैच्या दरम्यान संपूर्ण देश काबीज करतो. पण यंदा या सरासरी तारखेच्या ६ दिवस आधी संपूर्ण देशात मॉन्सून पोहोचलाय. त्या बरोबर मॉन्सून ट्रफही स्थापित झाला आहे.

मॉन्सून ट्रफ म्हणजे काय, ते समजून घ्यायला हवे, बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सून ट्रफ स्थापित झाला आहे. आज तो उत्तरेकडेच असून सध्या तो राजस्थानच्या बिकानेर अलवर तर उत्तर प्रदेशमधील हरडोई तसेच झारखंड मधील डालटणगांज आणि प. बंगालमधील शांतीनिकेतन मधून जात आहे. देशाच्या मध्य भू-भागावर झळकणाऱ्या या मॉन्सून ट्रफच्या दक्षिणोत्तर दोलनावरच यापुढे देशातील मोसमी पावसाचे वितरण, दिशा, प्रगती, तीव्रता आणि ओढ यासारख्या गोष्टी अवलंबून आहेत. थोडक्यात मोसमी पाऊस हे जर एक वाहन मानले तर 'मॉन्सून ट्रफ' हे त्याचे स्टिअरिंगं समजावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT