Gold Rate Agrowon
ताज्या बातम्या

Gold Rate : सोन्याचा दर ५५ हजारांवर

जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने-चांदीस झळाळी

Team Agrowon


अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : राज्यात प्रसिद्ध जळगावच्या सुवर्ण बाजारात (Gold Market) सोन्या, चांदीच्या दरातही वाढ होत आहे. मंगळवारी (ता. १३) सोन्याच्या दराने ‘जीएसटी’सह ५५ हजार ६०० रुपयांचा टप्पा (प्रतितोळा) पार केला. तर चांदीनेही प्रतिकिलो ६८ हजार ४९५ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
चार डिसेंबरला सोने ५३ हजार ८०० प्रतितोळा, तर चांदी ६५ हजार प्रतिकिलो (जीएसटी विना) होती. ४ डिसेंबरला सोन्याच्या दरात प्रतितोळा तीन हजारांची, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो साडेपाच हजारांची वाढ झाली होती. आगामी काळात सोन्याचे दर प्रतितोळा ६० हजारांचा टप्पा गाठेल, असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे, तो आता पूर्णत्वाकडे येत आहे.

गेल्या महिन्यात सुरू झालेल्या लग्नसराईमुळे सोन्याला मोठी मागणी होत आहे. सुवर्ण व्यवसायिकांच्या अनुभवानुसार सोने, चांदीच्या दरात हवी तशी भाववाढ होत नव्हती. आता चांगला दर सोने, चांदीला मिळाला आहे. तो आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. २५ नोव्हेंबरला चांदीत तब्बल दीड हजारांची वाढ होऊन चांदी ६३ हजार ५०० पर्यंत पोचली होती. १ डिसेंबरपासूनही सोने- चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या दिवशी सोने ५३ हजारांवर, तर चांदी ६४ हजारांवर पोचली होती.


काही दिवसांतील दर असे (जीएसटीविना)
तारीख-- सोने प्रतितोळा -- चांदी प्रतिकिलो
१ डिसेंबर-- ५३ हजार-- ६४ हजार
४ डिसेंबर-- ५३ हजार ८००-- ६५ हजार
८ डिसेंबर-- ५३ हजार ६००-- ६५ हजार
९ डिसेंबर-- ५३ हजार ८००-- ६६ हजार ५००
१३ डिसेंबर - ५४ हजार १०० -- ६६ हजार ५००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT