Agricultural Exhibition Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Exhibition : नारायणगाव केव्हीकेत ग्लोबल शेतकरी कृषी प्रदर्शन

नवीन खते, औषधे, बियाणे, यंत्र, अवजारे, उपकरणे, शेतमाल विक्री, करार शेती, स्वयंसेवी संस्था आणि कृषी तंत्रज्ञानाबाबत सादरीकरण करण्यात येणार आहे.

Team Agrowon

पुणे : जिल्हा कृषी महोत्सवांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि नारायणगाव (Narayangaon) ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र (Agricultural Science Center) यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी ९ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत नारायणगाव येथे ‘ग्लोबल शेतकरी कृषी प्रदर्शन’ (Agricultural Exhibition) आयोजित करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शेतकरी, विद्यार्थी, कृषी उद्योजक, कृषी सेवा पुरवठादार आदींसह नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालकांनी केले आहे.

ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या प्रांगणात होणाऱ्या या कृषी प्रदर्शनात शिवार फेरी, पीक प्रात्यक्षिके, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कृषी ज्ञान, तंत्रज्ञान संशोधनात अग्रेसर असलेल्या २५० हून अधिक राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्या, शासकीय विभागांचा, संस्थांचा सहभाग असणार आहे.

यामध्ये नवीन खते, औषधे, बियाणे, यंत्र, अवजारे, उपकरणे, शेतमाल विक्री, करार शेती, स्वयंसेवी संस्था आणि कृषी तंत्रज्ञानाबाबत सादरीकरण करण्यात येणार आहे.

शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, विविध शेतीपूरक जोडधंदे, शासकीय योजना, मूल्यवर्धन प्रक्रिया, उत्पादन ते विक्री, हायटेक शेती तंत्रज्ञान, कांदा, टोमॅटो, द्राक्ष उत्पादन आदी विषयांवरील पीक परिसंवाद, शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देणारी विशेष चर्चासत्रेदेखील आयोजित केली आहेत.

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले महिला व पुरुष शेतकरी, कृषी उद्योजक, कृषी पत्रकार, कृषी विस्तार कार्यकर्ता यांना ग्रामोन्नती कृषी सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT