Rohit Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Rohit Pawar : शेतकऱ्यांना विम्याचे पंचवीस टक्के अग्रिम द्या

Crop Insurance : राज्यातील १७ जिल्ह्यांतील २९७ महसूल मंडलांमध्ये पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड पडलेला आहे.

Team Agrowon

Nagar News : राज्यातील जिल्ह्यांतील २९७ महसूल मंडलांमध्ये पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड पडलेला आहे. यामध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघाचाही समावेश असून, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

येथील शेतकऱ्यांनी तूर, कापूस, मका, बाजरी, उडीद, मूग, सोयाबीन या पिकांसाठी विमा संरक्षण घेतले असून, पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीबाबत अधिसूचित महसूल मंडलांमध्ये ७ वर्षांच्या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत ५० टक्के घट आहे. त्यामुळे शासनाने पीक विम्यातील २५ टक्के अग्रिम शेतकऱ्यांना तातडीने द्यावे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी सांगितले, की कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये यंदाच्या वर्षी सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस झाला आहे. पाऊस नसल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळत आहेत. याशिवाय पशुधनही पाणी व चाऱ्याअभावी ग्रस्त आहे. हे पशुधन जगविण्यासाठी चारा छावण्यांची गरज आहे.

पशुधन आणि नागरिकांनाही पिण्यासाठी पाण्याची टंचाई जाणवत असल्याने पाण्याचे टँकरही चालू करण्याची गरज आहे. याबाबत त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनाही निवेदन दिले आहे.

शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के रक्कम मिळावी अशी विनंती मंत्रिमहोदयांना केली व चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर हे लवकर चालू करावे, अशी देखील विनंती केली. तसेच सरकारची मदत मिळेपर्यंत आम्ही खासगी टँकरने जसे आतापर्यंत पाणी देत आहोत तसेच यापुढेही टँकरने नागरिकांना पाणी देत राहू.
- रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT