Indian Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Nashik News : शेतीमालाला भाव द्या, नाहीतर गोळ्या झाडून आमचे कष्टमय जीवन संपवा

Indian Agriculture : मुंजवाड (ता. सटाणा) येथील शेतकरी संघटना, शेतकरी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शैक्षणिक पात्रतेच्या प्रती व अर्ज पाठवून मागणी केली आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Nashik Farmer : नाशिक : शेतकऱ्यांच्या मुलांनी प्रतिकूल परिस्थितीतही उच्च शिक्षण घेतले; मात्र त्यांना नोकऱ्या नाहीत. म्हणून सुशिक्षित तरुण शेती करत आहेत.

परंतु शेतीतही राबून कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव नाही. सरकारी धोरणामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुण शेतकरी अडचणीत सापडला आहे.

म्हणून सरकारने शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक पात्रतेप्रमाणे नोकरी द्यावी, नोकरी देणे शक्य नसल्यास तितके मानधन मिळावे आणि जर या बाबी देणे शक्य नसेल तर बंदुकीच्या गोळ्या झाडून आमचे कष्टमय जीवन संपवून आम्हाला मुक्ती द्यावी, अशी मागणी मुंजवाड (ता. सटाणा) येथील  शेतकरी संघटना, शेतकरी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शैक्षणिक पात्रतेच्या प्रती व अर्ज पाठवून केली आहे.

शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या खाली भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शासकिय धोरणविरोधी संतापाची लाट कायम आहे. असे असताना शेतकरी चळवळीची पार्श्‍वभूमी असलेल्या सटाणा तालुक्यातून पुन्हा एकदा तरुण शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.

आपल्या भावना व संताप पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून व्यक्त केला आहे. मुंजवाड येथील महादेव मंदिराच्या सभागृहात सोमवारी (ता. १२) सकाळी गावातील तरुण शेतकरी युवकांचा मेळावा झाला.

देशातील प्रत्येक सुशिक्षित शेतकऱ्याने पंतप्रधानांना वैयक्तिक पत्र पाठवून ही मोहीम राबवावी, असा ठराव मुंजवाड शेतकरी संघटनेचे महेंद्र जाधव यांनी मांडला. ही मोहीम राज्यभर राबविणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी दिला.

पत्रात मागणीसह संपूर्ण नावासह शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख आवर्जून केला आहे. या वेळी गावातील सर्व तरुण शेतकरी बेरोजगार युवक, शेतकरी संघटनेचे माणिक निकम, मोरेनगरचे उपसरपंच व्यंग्यचित्रकार किरण मोरे, भास्कर बागूल, नयन सोनवणे व मुंजवाड परिसरातील शेकडो तरुण शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT