Land Encroachment Agrowon
ताज्या बातम्या

Land Encroachment : गायरान जमिनींवरील अतिक्रमण काढणार

धरणगाव येथील वादग्रस्त गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढल्यानंतर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आता जिल्हाभरातील गायरान क्षेत्रावरील अतिक्रमण काढण्यासाठी आदेश निर्गमित केले असून, यासाठी समित्या गठित केल्या आहेत.

Team Agrowon

जळगाव: धरणगाव येथील वादग्रस्त गायरान जमिनीवरील (Grazing Land) अतिक्रमण (Land Encroachment) काढल्यानंतर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आता जिल्हाभरातील गायरान क्षेत्रावरील अतिक्रमण काढण्यासाठी आदेश निर्गमित केले असून, यासाठी समित्या गठित केल्या आहेत. गायरान अतिक्रमण निष्कासनाचा हा ‘धरणगाव पॅटर्न’ आता जिल्ह्यात राबविला जाणार आहे.

धरणगाव येथील वादग्रस्त गायरान जमिनीवरील अतिक्रमण जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये एरंडोल विभागाचे प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्यासह प्रशासनाने यशस्वीरीत्या राबविल्याने विशेषत: पोलिस प्रशासनाने ही परिस्थिती यशस्वीपणे हाताळल्याने जिल्हास्तरावर पोलिस, महसूल प्रशासनाचे कौतुक होत आहे.

हा ‘धरणगाव पॅटर्न’ आता राज्यभर राबविणार असल्याचे संकेत शासनस्तरावरून प्राप्त झाले आहेत. गेल्या दोन, तीन वर्षांपासून धरणगाव येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा वाद सुरू होता. यासाठी गायरान बचाव समितीने मोर्चा देखील काढला होता. मात्र विभागीय आयुक्तांच्या निर्णयानंतर हे अतिक्रमण काढण्यात आले. यासाठी शहरात शांतता आणि सुव्यवस्था राहावी, यासाठी संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली होती.

अत्यंत संवेदनशील असलेला हा विषय पोलिस, महसूल प्रशासनाने शहरातील नागरिकांना विश्वासात घेऊन शांतता कमिटीची बैठक घेऊन, जनतेला शांततेचे आवाहन करून कुठलाही वाद न होता हाताळला आहे. येथील प्रशासनाची हातोटी पाहता असा पॅटर्न जिल्हाभर राबविता येईल का' असा विचार जिल्हा प्रशासनाने केला असावा म्हणून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जिल्हाभर गायरान अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश दिले आहेत.

यासाठी समित्या देखील गठित करण्यात येत आहेत. या ‘धरणगाव पॅटर्न’मुळे जिल्ह्यातील गायरान मोकळा श्वास घेतील. भविष्यात धरणगावचा हा पॅटर्न राज्यभर राबविला जाईल, असे संकेत दिसून येत आहेत.

समन्वयामुळे अतिक्रमण निर्मूलन

पोलिस, महसूल अधिकारी, प्रशासन, नागरिक आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्यात समन्वय असेल तर कायद्याच्या चौकटीतील कोणतेच काम अवघड नाही, याचा चांगला अनुभव धरणगावकरांना आला. तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी नेहमीच समन्वयाने काम करतात. या कामामुळे शहरासह जिल्ह्यात अधिकारी वर्गाचे कौतुक होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Disease: उन्हाळ्यात टोमॅटो पिकातील विषाणूजन्य रोगांसाठी ३ सोपे उपाय

Sugarcane GPS Survey: उत्तर प्रदेशात ऊस पिकाचे जीपीएस सर्वेक्षण, शेतकऱ्यांना 'एसएमएस'द्वारे माहिती, अनेक फायदे मिळणार

Crop Insurance Delay: पीक विमा तत्काळ सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा

World Veterinary Day: पशुवैद्यकीय सेवांमुळेच पशुधन सुरक्षित

Farmer Protest: आंबा, काजू उत्पादकांचा १५ मे रोजी ‘वर्षा’वर मोर्चा

SCROLL FOR NEXT