Sugar cane Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Rate : ऊसदरासाठी सहकार शिरोमणी कारखान्याचे गेट केले बंद

उसाला पहिली उचल २५०० रुपये देण्याच्या मागणीसाठी ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या भाळवणी (ता. पंढरपूर) येथील कारखानास्थळावर बुधवारी (ता. ९) कारखान्याचे गेट बंद आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

सोलापूर ः उसाला (Sugarcane Rate) पहिली उचल २५०० रुपये देण्याच्या मागणीसाठी ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या भाळवणी (ता. पंढरपूर) येथील कारखानास्थळावर बुधवारी (ता. ९) कारखान्याचे गेट बंद आंदोलन करण्यात आले.

या वेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कारखानदारांच्या भूमिकेवर निषेध व्यक्त केला. तातडीने पहिली उचल जाहीर करा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही या वेळी नेत्यांनी दिला.

ऊसदर संघर्ष समितीचे दीपक भोसले, समाधान फाटे, माउली हळणवर, माऊली जवळेकर, तानाजी बागल, सचिन आटकळे, अजित बोरकर, रणजित बागल, कांतिलाल नाईकनवरे, निवास नागणे, सचिन नागणे, बाळू जगदाळे, शिवराम गायकवाड, शरीब तांबोळे आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी बोलताना श्री. भोसले म्हणाले, की उसाची पहिली उचल २५०० रुपये आणि अंतिम ऊसबिल ३१०० रुपये मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी गेली पंधरा दिवस आम्ही आंदोलन करतो आहोत. पण प्रशासन आणि कारखानदार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाचे नुकसान आम्हाला करायचे नाही, पण त्यांनीही थोडी कळ सोसली पाहिजे, पण आता आम्ही गप्प बसणार नाही.

आता थेट कारखान्याच्या चेअरमनला अडवून जाब विचारणार आहोत, कारखानदारांना ‘सळो की पळो’ करून सोडणार आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी दीपक भोसले, माऊली हळणवर, जवळेकर, बागल यांच्यासह शेतक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT