Winter Session  Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Politics : काँग्रेसचे चार माजी आमदार करणार शिंदे गटात प्रवेश

नवरात्रीत धमाका करण्याचा बेत फसला असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट हिवाळी अधिवेशनात मोठा बार उडवण्याच्या तयारीत आहे. विदर्भातील काँग्रेसचे चार माजी आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्या युवा सेनेचे आठ जिल्हा प्रमुख बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल होणार आहेत.

टीम अॅग्रोवन.

नागपूर ः नवरात्रीत धमाका करण्याचा बेत फसला असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assemble Winter Session 2022) मोठा बार उडवण्याच्या तयारीत आहे. विदर्भातील काँग्रेसचे चार माजी आमदार आणि उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray0 यांच्या युवा सेनेचे आठ जिल्हा प्रमुख बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल होणार आहेत. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

शनिवारी (ता.१२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भात असून गोसेखुर्द प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत. या माध्यमातून ते पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांची चाचपणी करणार असल्याचे समजते. युवा सेनेचे प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीसुद्धा विदर्भाच्या दौऱ्याचा बेत आखला आहे. त्यांचा विदर्भातील प्रवेश रोखण्यासाठी युवा सेनेलाच सुरुंग लावण्यात येणार आहे.

युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठोपाठ विदर्भातील आठ जिल्हा प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना पक्षात येतील. हा प्रवेश हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्त्वात होणाऱ्या मेळाव्यात होईल. काँग्रेसचे चार माजी आमदारही संपर्कात आहेत. तेही याचवेळी प्रवेश करतील, असे तुमाने यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT