Sugarcane Fire Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Fire : वीजवाहक तारा पडून चार एकर ऊस जळून खाक

गावातील नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे उर्वरित क्षेत्रातील ऊस वाचविण्यात यश आले.

Team Agrowon

Sugarcane Fire News अंबासन, ता. सटाणा : द्याने (ता. सटाणा) येथील उस उत्पादक (Sugarcane Farmer) शेतकरी सुरेखा भरत कापडणीस यांच्या गट क्र.१६० व गौरव भरत कापडणीस यांच्या गट क्र.१६२ या दहा एकरातील उसाच्या शेतात (Sugarcane Fire) शनिवारी (ता. ११) जीर्ण झालेली उच्च दाबाची वीजवाहक तारा तुटून पडल्याने चार एकरावरील ऊस जळून खाक झाला.

गावातील नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे उर्वरित क्षेत्रातील ऊस वाचविण्यात यश आले. दरम्यान, ‘महावितरण’च्या निष्कळजीपणामुळे उस जळाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन औरंगाबाद-अहवा राज्य महामार्गावरील राजपूर पांडे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करत संताप व्यक्त केला.

गेल्या अनेक वर्षांपासून महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी त्रस्त आहेत. याच परिसरात मागील आठवड्यात रोहित्रावरील उच्च दाबाची जीर्ण झालेली तारा तुटली होती.

या वेळी कांदा पिकांना पाणी देत असताना शेतकरी महेंद्र धर्मा कापडणीस हे बचावले होते. कंपनीला जीर्ण वीजवाहक तारांसाठी माहिती देऊनही डोळेझाक होत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, जायखेडा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधींसह फौजफाटा घेऊन तत्काळ आंदोलनस्थळी दाखल झाले. महावितरण कंपनीचे आधिकारी आंदोलनस्थळी भेट देत नाहीत तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, असा पवित्रा संतप्त शेतकऱ्यांनी घेतला.

दरम्यान महावितरणचे कोणीही आधिकारी फिरकले नाहीत. शेकडो शेतकऱ्यांनी राजपूर पांडे फाट्यावर तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. पारधी यांनी मध्यस्थी केल्यानंतर शेतकऱ्यांनी तुर्तास आंदोलन मागे घेतले.

आंदोलनात मधुकर कापडणीस, तुषार कापडणीस, शैलेंद्र कापडणीस, सतीष कापडणीस, श्रीकृष्ण कापडणीस, सुपनराव कापडणीस, निंबा कापडणीस, शांताराम कापडणीस, नानाजी कापडणीस, सचिन कापडणीस, दिलीप कापडणीस, राहुल कापडणीस, महेंद्र कापडणीस, दयाराम कापडणीस, मंगेश कापडणीस, गोपाळ कापडणीस, गणेश कापडणीस, सचिन नामदेव कापडणीस, दिनेश कापडणीस, संदीप कापडणीस आदी सहभागी झाले होते.

‘महावितरण’ला इशारा

संतप्त शेतकऱ्यांनी सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेतले; मात्र सोमवारपर्यंत (ता. १३) जीर्ण तारांच्या दुरुस्तीसह सुरळीत वीज पुरवठ्याबाबत ‘महावितरण’ कंपनीला इशारा दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT