Ex Minister Sunil Kedar Agrowon
ताज्या बातम्या

Ex Minister Sunil Kedar : माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

६ ऑक्टोबर २०१६ रोजी महापारेषणचे सहाय्यक अभियंता अमोल खुबाळकर हे दोन-तीन अधिकाऱ्यांसह तेलगाव येथे शेतकऱ्यांशी त्यांच्या पिकहानीच्या भरपाईसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी गेले. सोबत येथील कंत्राटदार कंपनीचा एक अधिकारीही होता.

Team Agrowon

नागपूर : कोराडी ते तिडंगीदरम्यान अतिउच्च दाबवाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यास मारहाण केल्या प्रकरणात सावनेरचे तत्कालीन आमदार व माजी मंत्री सुनील केदार (Ex Minister Sunil Kedar) यांना सत्र न्यायालयाने एक वर्षाची (Punishment) शिक्षा सुनावली.

६ ऑक्टोबर २०१६ रोजी महापारेषणतर्फे कोराडी-तिडंगीदरम्यान अति उच्चदाब वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीही अधिग्रहीत करण्यात आल्या.

वाहिनीसाठी येथे मोठमोठे मनोरे उभारण्यात आले. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी महापारेषणचे सहाय्यक अभियंता अमोल खुबाळकर हे दोन-तीन अधिकाऱ्यांसह तेलगाव येथे शेतकऱ्यांशी त्यांच्या पिकहानीच्या भरपाईसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी गेले. सोबत येथील कंत्राटदार कंपनीचा एक अधिकारीही होता.

अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच केदार त्यांच्या सुमारे २० सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. महापारेषणला येथे काम सुरू करण्याची परवानगी दिली कुणी, हा प्रश्न विचारून त्यांच्यासह इतर चौघांनी थुबाळकर व कंत्राटदाराच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करून अचानक मारहाण सुरू केली.

दरम्यान, या प्रकरणात सावनेर पोलिसांनी केदार यांच्यासह कार्यकर्त्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले होते. सर्व साक्षीदार व पुरावे तपासत न्यायालयाने केदार यांना एक वर्षांची शिक्षा सुनावली. शासनातर्फे ऍड. अजय माहूरकर यांनी बाजू मांडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT