Protest
Protest Agrowon
ताज्या बातम्या

Maviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : ‘शेतकऱ्यांना न्याय मिळू न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे’, ‘कृषिमंत्री हाय हाय’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी (ता.२४) विभागीय आयुक्तालयासमोर (Collector Office Aurangabad) धरणे आंदोलन करण्यात आले. ‘‘अतिवृष्टीची (Heavy Rain) मदत जाहीर करूनही अद्याप शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात मदत जमा झालेली नाही. हे सरकार खोटारडे आणि संवेदनाहीन आहे,’’ असा आरोप या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला.

अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत मिळावी, या प्रमुख मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी (ता.२४) आंदोलन करण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते.

नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, अशुतोष डंख, मोहन मेघावाले, कॉंग्रेसचे डॉ. कल्याण काळे, अनिल पटेल, शेख युसूफ , नामदेव पवार, ॲड. अक्रमखान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खाजा मुल्ला आदी उपस्थित होते. दानवे म्हणाले, ‘‘जूलै ,ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली.

सप्टेंबरमध्येही काही भागात अतिवृष्टी झाली. पहिल्या अतिवृष्टीच्यावेळीच जर मदत केली असती तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली नसती. राज्य सरकारने भरपाई देण्याची घोषणा करून २० दिवस झाले तर अजूनही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात मदतीची रक्कम जमा झाली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

SCROLL FOR NEXT