Raju Shetti Agrowon
ताज्या बातम्या

Raju Shetti Latest News : ‘स्वाभिमानी’तर्फे कोल्हापुरात पहिले ‘नांगरट साहित्य संमेलन’

Nangarat Sahitya Samelan : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चार जूनला ‘नांगरट साहित्य संमेलन’ होणार आहे.

Team Agrowon

Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चार जूनला ‘नांगरट साहित्य संमेलन’ होणार आहे. येथील स्वामी विवेकानंद कॉलेज येथे ज्येष्ठ साहित्यिक व प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होईल, अशी माहिती ‘स्वाभिमानी’चे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली

श्री. शेट्टी म्हणाले, की शेतकऱ्यांच्या आजच्या प्रश्‍नांवर साहित्यिक, कलावंत, विचारवंत यांच्यामध्ये सखोल विचारमंथन व्हावे. शेतकरी चळवळीला यातून कालसंगत दिशा मिळावी. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवार प्रतिष्ठान यांच्यामार्फत हे संमेलन होत आहे. प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप हे या परिषदेचे निमंत्रक आहेत. संमेलनाचे उद्‌घाटन प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे करणार आहेत.

संमेलनाला उत्सवी स्वरूप न देता शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्‍नांवर चर्चा व्हावी. या चर्चेच्या माध्यमातून भविष्यकालीन शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा ठरावी. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटण्यासाठी या संमेलनामध्ये ठोस उपाययोजना पुढे याव्यात. शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्‍नांवर साहित्यिकांनी लिहावे.

त्यांनी मार्गदर्शन करावं. यासाठी हे संमेलन तीन सत्रांत होणार आहे. उद्‌घाटनाच्या सत्रामध्ये संमेलनाचे उद्‌घाटक फुटाणे, स्वागताध्यक्ष शेट्टी, निमंत्रक कवी संदीप जगताप व कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल वाघ हे मनोगत व्यक्त करतील.

दुसऱ्या सत्रामध्ये शेतकरी प्रश्‍नांचे साहित्य, कला, माध्यमे व राजकारण यात उमटलेले प्रतिबिंब या विषयांवरचा परिसंवाद ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

या परिसंवादामध्ये प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे, प्रसिद्ध वक्ते इंद्रजित देशमुख, चित्रपट निर्माते प्रवीण तरडे, ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, ज्येष्ठ विचारवंत प्रा. जालंदर पाटील सहभागी होतील.

तिसऱ्या सत्रात प्रसिद्ध कवी प्रा. सुरेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी कवी संमेलन संपन्न होईल. या कवी संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत कवी विजय चोरमारे (कोल्हापूर) भरत दौंडकर (पुणे), अरुण पवार (बीड) विष्णू थोरे (नाशिक), रमजान मुल्ला (सांगली), आबा पाटील (बेळगाव) लता ऐवळे (सांगली), बाबा परीट (कोल्हापूर) सुरेश मोहिते (सांगली), गोविंद पाटील (कोल्हापूर), एकनाथ पाटील (सांगली), अभिजित पाटील (सांगली) बबलू वडार (कडोली), विष्णू पावले, (कोल्हापूर) या निमंत्रित कवींचे कवी संमेलन होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT