Ghodganga Sugar Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane FRP : ‘घोडगंगा’ची पहिली उचल प्रतिटन अडीच हजार रुपये

शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याकडून २०२२-२३ या चालू गळीत हंगामासाठी आलेल्या उसाला प्रतिटन दोन हजार पाचशे रुपयांप्रमाणे उचल दिल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज अशोक पवार यांनी दिली.

टीम ॲग्रोवन

पुणे : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याकडून (Ghodganga Sugar Mill) २०२२-२३ या चालू गळीत हंगामासाठी (Crushing Season) आलेल्या उसाला प्रतिटन (Sugarcane FRP) दोन हजार पाचशे रुपयांप्रमाणे उचल दिल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज अशोक पवार यांनी दिली.

‘घोडगंगा’च्या चालू गळीत हंगामाची माहिती अध्यक्ष पवार यांनी ही माहिती दिली. कारखान्याची सध्या अडचणीतून वाटचाल सुरू असली; तरी हा हंगाम यशस्वी झाल्यास कारखान्याची स्थिती पूर्वपदावर येईल.

कारखान्याने चालू गळीत हंगामात आजअखेर एक लाख ३६ हजार ५७० टन उसाचे गाळप केले असून, १०.४७ टक्के साखर उताऱ्याने एक लाख ३९ हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाला अॅडव्हान्स (उचल) देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून प्रतिटन दोन हजार पाचशे रुपयांप्रमाणे होणारी रक्कम सभासद शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली आहे.

घोडगंगा हा आपला हक्काचा साखर कारखाना असून ही संस्था अडचणीतून आणि पुन्हा गतवैभवाने उभी करायची असेल, तर अधिकाधिक उसाचे गाळप व्हायला हवे. कारखान्याला भरपूर ऊस गाळपासाठी मिळाला, तर त्यापटीत बाजारभाव देण्यासाठी कारखान्याची स्थिती सक्षम होईल.

ऊसउत्पादक शेतकरी सभासदांच्या उसाला चांगला बाजारभाव देण्याचा आमचा निर्धार आहे. त्यासाठी सभासदांनीही आपला अधिकाधिक ऊस आपल्या कारखान्याला दिला पाहिजे.
ऋषिराज अशोक पवार, अध्यक्ष, घोडगंगा साखर कारखाना, न्हावरे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT