Agriculture News  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Education Center : मुक्त विद्यापीठांतर्गत वाशीममध्ये पहिले कृषी शिक्षण केंद्र कार्यान्वित

Yashwantrao Chavan Maharashtra Open University : रिसोड येथील कृषी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत जिल्ह्यातील एकमेव कृषी शिक्षण केंद्र या वर्षात मंजूर झाले आहे.

Team Agrowon

Washim News : रिसोड येथील कृषी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत जिल्ह्यातील एकमेव कृषी शिक्षण केंद्र या वर्षात मंजूर झाले आहे. या केंद्राचे उद्‍घाटन माजी खासदार तथा महाविद्यालयाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाले. उद्‍घाटन म्हणून पोलिस निरीक्षक वीरेंद्रसिह ठाकूर उपस्थित होते.

या वेळी संस्थेचे विश्वस्त चैतन्य देशमुख, तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप, नायब तहसीलदार टी. डी. कुळमेथे होते. कृषी महाविद्यालयाचे तांत्रिक समन्वयक तथा कीटकशास्त्रज्ञ आर. एस. डवरे यांनी मुक्त कृषी शिक्षण प्रणालीअंतर्गत अद्ययावत शिक्षणाद्वारे काम करून व अर्थार्जन करून कसा सर्वांगीण विकास केला जाऊ शकतो याविषयी माहिती दिली.

विरेंद्रसिह ठाकूर महाविद्यालय व्यवस्थापनाने जिल्ह्यात पहिलेच प्रथम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कृषी शिक्षण केंद्र मंजुर करून आणत शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन केले. विविध अभ्यासक्रमांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या मुक्त कृषी शिक्षणाचा लाभ घेऊन संधीचे सोने करावे, असे आवाहन केले.

चैतन्य देशमुख यांनी सुद्धा याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले.. अध्यक्षीय भाषणा अनंतराव देशमुख यांनी दर्जेदार शिक्षणाद्वारे केवळ परीक्षार्थी निर्माण करण्याऐवजी कौशल्य प्रदान शिक्षणाद्वारे रोजगाराच्या संधी प्राप्त करून देणाऱ्या शिक्षणावर भर दिल्या जाईल.

यासाठी कृषी महाविद्यालय तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कृषी शिक्षण केंद्रातील शिक्षणाद्वारे काम होईल, असे नविनतम प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आश्वास्त केले. सूत्रसंचालन राजेश डवरे यांनी केले. आभार केंद्र संयोजक प्रा. इरफान शेख यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT