Agriculture Department
Agriculture Department Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department : ..अखेर पदोन्नतीने तीन ‘एसएओ’चे रिक्त पदे भरले

Team Agrowon

Chhatrapati Sambhaji Nagar : मराठवाड्याच्या कृषी विभागातील (Agriculture Department) छत्रपती संभाजीनगर, धाराशिव व जालना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (Agriculture Officer) यांची पद पदोन्नतीने भरले आहेत. दुसरीकडे प्रकल्प संचालक आत्मा, उपसंचालक आत्मा, उपविभागीय कृषी अधिकारी अशी महत्त्वाची पद काही ठिकाणी अजूनही रिक्त आहेत.

मराठवाड्याच्या राजधानीचे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगर कडे पाहिले जात. राज्य व केंद्र सरकारमधील मंत्र्यांची खातीही मराठवाड्यातील उद्योग नगरी व राजधानीच्या वाटेवर. परंतु या मंत्र्यांच्या जिल्ह्यातच कृषी अधिकाऱ्यांची महत्त्वाची पदच महिनोंमहिने रिक्त आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा भार जिल्हा परिषदचे कृषी विकास अधिकारी प्रकाश देशमुख यांच्या खांद्यावर होता. आता त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदी पदोन्नती मिळाली आहे.

त्यामुळे त्यांच्या मूळ जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी पदी आता प्रभारी अधिकारी असेल. जालना तसेच धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्याच्या खांद्यावर जिल्हा अधीक्षक पदाची होती.

जालन्याचे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे पदोन्नतीने हिंगोलीत रुजू होऊन निवृत्त झाले. त्यांच्या जागी आता नगर जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी असलेले गहिनीनाथ कापसे यांना पदोन्नतीने नियुक्ती मिळाली आहे. धाराशिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी अहमदनगर जिल्ह्यातीलच कृषी उपसंचालक रवींद्र माने यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

लातूर कृषी विभागात कृषी विकास अधिकाऱ्यांची पाच पैकी तीनच पदे भरलेली असून दोन रिक्त आहेत. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या मंजूर १० पैकी निम्मी ५ पद रिक्त आहेत.

तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी यांच्या मंजूर १०३ पदांपैकी केवळ ६१ भरलेली असून तब्बल ४२ पदे रिक्त आहेत. याशिवाय वर्ग दोन कनिष्ठ कृषी अधिकारी यांच्या मंजूर १९८ पदांपैकी १४८ पदे भरली असून ५० पदे रिक्त आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन जिल्ह्यात वर्ग-१ ची २९ पदे मंजूर असताना केवळ नऊ पदे भरण्यात आली तर तब्बल २० पदे रिक्त आहेत. वर्ग-२ च्या मंजूर ६९ पदांपैकी ३५ पद भरले असून तब्बल ३४ पद रिक्त आहेत. याशिवाय कनिष्ठ वर्ग-२ ची १६४ पदे मंजूर असताना त्यापैकी १०७ पद भरलेली आहेत तर तब्बल ५७ पद रिक्त आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : पाणीटंचाईची सर्वाधिक झळ महिलांनाच

Interview with Vikas Patil : शेतकऱ्यांनी केवळ युरियाचा आग्रह धरू नये

Village Story : वळवाचा पाऊस...

Turmeric Cultivation : हळद लागवडीची पूर्वतयारी

Finland Banking System : फिनलँडमधील सक्षम सहकारी बँकिंग व्यवस्था

SCROLL FOR NEXT