Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा भरून मिळवा कुट्टी मशिनचे बक्षीस

Crop Insurance Scheme : अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना अवजारे बक्षिस योजना जाहीर करण्यात आली आहे.

Team Agrowon

Pune News : अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना अवजारे बक्षिस योजना जाहीर करण्यात आली आहे. यासाठी विठ्ठल जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी सिंगापूर गावात १ रुपयात पीकविमा अर्ज भरण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला. भाग्यवान शेतकऱ्याला कुट्टी मशिन, फवारणी पंप व इतर शेतकऱ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.

मेळाव्याला तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान पंतप्रधान खरीप पीकविम्यामार्फत शेतकऱ्यांना मिळू शकते. शासनाने पीकविमा एक रुपयांमध्ये केला आहे. मात्र शेतकऱ्यांमध्ये पीकविम्याबाबतीत उदासीनता दिसून येत आहे.

त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेबाबत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जगताप यांनी पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना ३० हजार रुपये किमतीची कुट्टी मशिन, फवारणी पंप व इतर शेतीउपयोगी साधने बक्षीस स्वरूपात ठेवली. परिणामी सिंगापूर, आंबळे येथील कांदा, बाजरी, भुईमूग उत्पादकांनी सहभाग घेत पीकविमा उतरविला.

तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी पंतप्रधान पीकविमा शेतकऱ्यांना कसा लाभदायी आहे, या संदर्भात मार्गदर्शन केले. पीकविम्याबाबत जनजागृतीसाठी जगताप यांनी प्रयत्न केल्याबद्दल उपसरपंच सौरभ लवांडे यांनी त्यांचे आभार मानले. सिंगापूर गावातील प्रथम पीक विमा काढणारे शेतकरी शंकर लवांडे यांना पीकविमा भरलेली पोचपावती देण्यात आली.

सरपंच संगीता वारे, कृषी मंडल अधिकारी गणपत वाघमारे, कृषी पर्यवेक्षक सचिन जगताप, किरण हरपळे, उपसरपंच सौरभ लवांडे, विशाल लवांडे, विक्रांत पवार, पोलिस पाटील यादवेंद्र उरसळ, ग्रामसेवक उज्ज्वला हिंगणे, गोविंद शेतकरी सेवा केंद्राचे प्रमुख भूषण जगताप, अजिंक्य दरेकर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT