Fertilizer Linking Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer Linking : आजपासून साताऱ्यातील खत विक्रेत्यांचा बंद

खत उत्पादकांकडून दुकानदारांचे लिंकिंग, एक्स खतपुरवठ्यामुळे होणारा अन्याय व शासनाच्या आदेशाचे उल्लंघनासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कृषी खत विक्रेत्यांनी आजपासून (ता. १६) बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

सातारा ः खत उत्पादकांकडून दुकानदारांचे लिंकिंग (Fertilizer Linking), एक्स खतपुरवठ्यामुळे (Fertilizer Supply) होणारा अन्याय व शासनाच्या आदेशाचे उल्लंघनासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कृषी खत विक्रेत्यांनी आजपासून (ता. १६) बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे. त्याचे निवेदन कृषी विक्रेता संघटनेने जिल्हाधिकारी रूचेश राजवंशी यांना दिले आहे.

निवेदनानुसार, मागील खरिपाच्या सुरुवातीपासून जिल्हा संघटना, माफदा व ऑल इंडिया असोसिएशनने संयुक्तरीत्या कृषिमंत्री व आयुक्तांसह केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी विविध मागण्यांबाबत पत्र व्यवहार केला आहे.

त्याची सरकारने दखल घेत काही निर्णय घेतले. रासायनिक खतांच्या अनुषंगाने असणारे ‘एक्स रेल’ किंवा ‘एक्स गोडाउन आणि रासायनिक खतांसोबत लिंकिंग न करण्याचे आदेश दिले.

मात्र त्याकडे खत उत्पादकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. कंपन्या खते पोहोच देत नाहीत. उलट खतांचे भाडे वेगळे आकारतात. रेल्वे रॅक लागण्यापूर्वी रॅकची ऑर्डर देऊनही कंपनी खत गोदामात पाठवते व त्यानंतर विक्रेत्यांना कंपनी निरोप पाठवते. त्यामुळे रासायनिक खते महाग पडतात.

त्यामुळे बाजारामध्ये विक्रेता लिंकिंग करतो किंवा जास्त दराने विकतो अशी चुकीची प्रतिमा तयार होत आहे. उत्पादक जोपर्यंत लेखी स्वरूपात हमी घेऊन विक्रेते, शासन व बळीराजाची होणारी फसवणूक बंद करत नाहीत, तोपर्यंत ग्राहकांच्या हितासाठी कृषी विक्रेत्यांना बंद ठेवावा लागतो आहे, असे निवेदनात नमूद आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT