Agriculture Inputs Agrowon
ताज्या बातम्या

Bogus Fertilizer : कळंब येथील जप्त खत, कीटकनाशके बनावट

Agriculture Inputs : कृषी विभागाच्या पथकाने राळेगाव मार्गावरून सहा लाख रुपये किमतीचे खत आणि कीटकनाशक जप्त केले होते. त्यानंतर निविष्ठांचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले.

Team Agrowon

Yavatmal News : कृषी विभागाच्या पथकाने राळेगाव मार्गावरून सहा लाख रुपये किमतीचे खत आणि कीटकनाशक जप्त केले होते. त्यानंतर निविष्ठांचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. हे नमुने ‘फेल’ आल्याने या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक येथील गोल्डन अपॉर्च्युनिटी कंपनीच्या व्यवस्थापक मोनाली ठाकरे (वय २४, रा. नाशिक), विनोद ओंकार (रा. कळंब, यवतमाळ), नमो ऑर्गेनिक कंपनी नरखेड, गजानन ज्ञानेश्‍वर खेरडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनधिकृत जागेत खताचा साठा करून विक्री करणे, राज्य व केंद्र शासनाने अधिकृत न केलेल्या खताच्या ग्रेडचे उत्पादन, नोंदणी प्रमाणपत्र न घेता खताची विक्री करणे, यातून शेतकरी आणि शासनाची फसवणूक करणे अशा कारणांवरून ही कारवाई करण्यात आली. कळंब तालुका कृषी अधिकारी शुभ्रकांत भगत यांनी तक्रार दाखल केली होती.

१६ जून रोजी एमएच १५ एफव्ही ३७३४ क्रमांकाच्या ट्रकमधून कळंब येथील गजानन खेरडे यांच्या मालकीच्या गोदामात निविष्ठांचा साठा विनोद ओंकार उतरवीत होते. त्यांच्याकडे या निविष्ठांविषयी चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतीच कागदपत्रे आढळून आली नव्हती. परिणामी, हा साठा जप्त करण्यात आला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT