Mango Production Agrowon
ताज्या बातम्या

Mango Production : मोहर न आल्‍याने आंबा बागायतदारांना नुकसानाची भीती

२०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी आंब्‍याची झाडे उन्मळून पडल्‍याने बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते.

Team Agrowon

रोहा ः हवामान बदलाचा फटका आंबा उत्‍पादकांना (Mango Producer) बसण्याची शक्‍यता आहे. अद्याप मोहर (mango Blossom) न आल्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत. २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे (Cyclone Nisarg) अनेक ठिकाणी आंब्‍याची झाडे उन्मळून पडल्‍याने बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते.

मात्र यातून जी झाडे वाचली, त्‍यांना अद्याप मोहोन आलेला नाही. ज्‍या झाडांना मोहर आला, तोही गळून पडल्‍याचे बागायतदार सांगतात.

रोहे तालुक्यातील सुतारवाडी, जामगाव, दुरटोली, ढोकलेवाडी, गौळवाडी (विजयनगर) कामथ, सावरवाडी, येरळ, कुडली, अंबिवली, नारायणगाव, तांबडी, वीरजोली इत्यादी ठिकाणी फार्महाऊस आहेत.

या फार्महाऊसच्या परिसरात जास्तीत जास्त आंब्याच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. मोहर न आल्यामुळे फार्म हाऊस मालकांनाही चिंता लागली आहे. या विभागातील आंबे मोठ्या प्रमाणावर परदेशात किंवा अन्य राज्‍यात विक्रीसाठी जातात.

मात्र यंदा अद्याप मोहर आल्‍याने उत्‍पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. दोन वर्षेही चक्रीवादळामुळे आंबा उत्‍पादनावर परिणाम झाला होता. यंदा हवामान बदलामुळे नुकसान होण्याची धास्‍ती बागायतदारांना आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

VBG-Ram-ji: ग्रामीण रोजगाराच्या हमीची ऐशी-तैशी

Indian Political Challenges: राहुल गांधी आणि ‘सीजेपी’चे सरकारपुढे आव्हान

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

SCROLL FOR NEXT