Rain Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान

राज्यात पावसाला पोषक हवामान असून, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होत थंडी गायब झाली आहे.

Team Agrowon

पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान असून, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी (Rainfall) लावली आहे. ढगाळ हवामानामुळे (Cloudy Weather) किमान तापमानात वाढ होत थंडी (Cold Weather) गायब झाली आहे.

आज (ता. २८) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. गुरूवारी (ता.२६) सायंकाळनंतर नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

ढगाळ हवामानामुळे राज्यात थंडी गायब झाली असून, शुक्रवारी (ता. २७) उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे राज्यातील निचांकी ११ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान ११ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. उन्हाचा चटका कायम असल्याबरोबरच ढगाळ हवामानामुळे राज्यात उकाडा वाढला आहे. ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

यातच अग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, त्याला लागूनच चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली श्रीलंकेकडे सरकताना आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतातील राज्यात थंडी पुन्हा वाढू लागली आहे. शुक्रवारी (ता. २७) राजस्थानच्या चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी उणे ०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २८) पूर्व राजस्थानात विजा, गारपीटीसह पावसाचा अंदाज आहे

शुक्रवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.८ (१५.४), जळगाव २८.८ (१५.५), धुळे २८.० (११.७), कोल्हापूर ३०.१ (१९.५), महाबळेश्वर २५.६ (१५.६), नाशिक २९.४ (१६.५), निफाड २९.२ (११.०), सांगली ३१.० (१९.३), सातारा ३१.९ (१८.२), सोलापूर ३३.० (१७.०),

सांताक्रूझ २८.८ (१८.९), डहाणू २३.७ (१६.८), रत्नागिरी ३०.६(२०.१), औरंगाबाद २८.२ (१३.२), नांदेड - (१६.४), उस्मानाबाद - (१७.६), परभणी ३०.५(१४.५), अकोला ३१.७ (१७.५), अमरावती ३२.२ (१६.०),

बुलढाणा २९.२ (१६.५), ब्रह्मपूरी ३३.२ (१५.५), चंद्रपूर ३०.२ (१५.६), गडचिरोली ३०.२(१५.२), गोंदिया ३१.२(१४.८), नागपूर ३१.३ (१४.४), वर्धा ३१.५(१५.५), वाशीम - (१४.६), यवतमाळ ३०.५ (१४.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought 2026 : दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा महसूलमंत्र्यांनी घेतला आढावा; नुकसानीचे अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश

Tur Story: तुरीची गोष्ट

Weather Update : ढगांची गर्दी; पावसात नाही जोर!

Rajkesar Mango : हिमायतबागेच्या राजकेसर आंबा वाणाला मान्यता

Global Agri Market: जागतिक शेतीमाल बाजारातील नरमाई तात्पुरती?

SCROLL FOR NEXT