Rain Alert Agrowon
ताज्या बातम्या

Weather News Update : राज्यात पावसाला पोषक हवामान

Summer Heat : उन्हाचा चटका वाढला असतानाच राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.

Team Agrowon

Pune Weather Update News : उन्हाचा चटका (Heat) वाढला असतानाच राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. उद्या (ता. ४) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे.

तर रविवारपासून (ता. ५) राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तवला आहे. यातच राज्यात उन्हाचा चटका देखील कायम राहणार आहे.

राज्यात उन्हाळा हंगामाला सुरूवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला. कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने झळाही वाढत आहेत.

गुरूवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपूरी येथे देशातील उच्चांकी ३७.८ अंश तापमानाची नोंद झाली.

तर अकोला येथे ३७.५ अंश सेल्सिअस, सोलापूर, बुलढाणा, वाशीम, अमरावती, चंद्रपूर येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्यान राज्याच्या किमान तापमानात सातत्याने वाढ होतच आहे. गुरूवारी (ता. २) राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या पुढे असल्याने थंडी ओसरली आहे.

यातच उद्या (ता. ४) पश्चिम मध्य प्रदेशात विजांसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

गुरूवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.६ (१४.६), जळगाव ३५.५ (१६.०), कोल्हापूर ३३.४ (१९.९), महाबळेश्वर २९.७ (१६.४), नाशिक ३४.३ (१५.८), निफाड ३३.०(१२.०), सांगली ३५.० (१९.९), सातारा ३३.८ (१६.७), सोलापूर ३६.२ (१८.७),

सांताक्रूझ ३३.५ (२१.६), डहाणू ३२.२ (२१.०), रत्नागिरी ३५.३ (२२.३), छत्रपती संभाजीनगर ३४.० (१४.७), नांदेड ३५.८ (१९.२), परभणी ३५.९(१७.५), अकोला ३७.५ (१९.८), अमरावती ३६.०(१८.७), बुलढाणा ३६.२(२०.८),

ब्रह्मपूरी ३७.८ (१९.५), चंद्रपूर ३६.० (२०.०), गडचिरोली ३४.०(१५.८), गोंदिया ३४.२ (१७.६), नागपूर ३४.८ (१८.४), वर्धा ३५.९(१९.५), वाशीम ३६.२ (१८.०), यवतमाळ ३५.७ (१९.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT