Soybean yellow mosaic disease agrowon
ताज्या बातम्या

Soybean Yellow Mosaic Disease : सोयाबीनवर यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी हतबल

Agricultural Officer Kolhapur : शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यास मोठा फटका बसल्याने विमा कंपन्यांना याबाबत कृषी अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

Team Agrowon

Kolhapur Soybean News : कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीन पिकावर मोठे संकट ओढावले आहे. काही दिवसांपूर्वी झालेला प्रंचड पाऊस अन् अचानक उन्हाचा तडाखा बसल्याने सोयाबीन पिकावर किडीने थैमान घातले आहे. दरम्यान राहुरी कृषी विद्यापिठाने शिफारस न केलेल्या सोयाबीनवर यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढला.

याचा सर्वात मोठा फटका शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यावर बसल्याने विमा कंपन्यांना याबाबत कृषी अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. शिरोळ- हातकणंगले तालुक्यातील यलो मोझॅक या रोगाने शेतकरी धास्तावला आहे.

पावसाने ओढ दिल्यामुळे हातकणंगले व शिरोळ तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र घटले आहे. यातच राहुरी कृषी विद्यापीठाच्या शिफारशी नसलेल्या वाणांची लागवड करण्यात आली आहे. अशा पिकांवर पहिल्या टप्प्यात यलो मोझॅकचा प्रादुर्भाव दिसत आहे.

मात्र इतर जातीच्या सोयाबीनवरदेखील यलो मोझॅकचा प्रभाव वाढला आहे. नियमित कालावधीपेक्षा लवकर पेरणी केलेल्या सोयाबीनवर खास करून हा प्रादुर्भाव जाणवत आहे.

याबाबत तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी जात शेतीची पाहणी केली. किडीचा प्रभाव पाहून शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात येत आहे. विद्यापीठाने शिफारशी न केले शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत शिवाय मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही पीक हाताला लागणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

जून महिना पावसाअभावी गेला यामुळे कडक ऊन, कधी ढगाळ वातावरण, तर कधी पावसाच्या हलक्या सरी अशा प्रतिकूल वातावरणाचा परिणामामुळे सोयाबीन पिकाला धोका पोहोचला आहे. दरम्यान रोगामुळे शेतकरी औषध फवारणी करत आहेत. याचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना बसत आहे.

एक महिना उशिरा सुरू झालेल्या पावसाने पाणी कपातीचे संकट निर्माण झाले. शिवाय काही काळ सुरू झालेला झालेला पाऊस नंतर पूर्णपणे थांबल्याने सध्या सोयाबीनला पाण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुराची स्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी नदीवरील मोटारी सुरक्षित ठिकाणी हलवल्या. त्यामुळे आता वेळेत पाणीही मिळू शकत नाही. सर्वच बाजूंनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाल्याचे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT