Bamboo Agrowon
ताज्या बातम्या

Bamboo Farming : शेतकऱ्यांना बांबू पिकातून मिळणार अधिकचे उत्पन्न

पावसावर आधारित डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे शेतीला शाश्‍वत उत्पन्नाची जोड देण्यासाठी बांबू लागवडीपासून ते थेट विक्रीपर्यंत मूल्यवर्धित साखळी निर्माण करण्यात येणार आहे.

टीम ॲग्रोवन

वेल्हे, जि. पुणे ः पावसावर आधारित डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे शेतीला शाश्‍वत उत्पन्नाची (Sustainable Agriculture Income) जोड देण्यासाठी बांबू लागवडीपासून (Bamboo Farming) ते थेट विक्रीपर्यंत मूल्यवर्धित साखळी (Agriculture Value Chain) निर्माण करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचे उद्‍घाटन दिवाळीच्या मुहूर्तावर वेल्हे तालुक्यातील धानेप गाव येथे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, संधी बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे सचिन अग्रवाल तोरणा ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे चेअरमन श्रीरंग चोरघे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या उद्‍घाटन प्रसंगी संचालक इको व्हिलेज वेल्हे निखिल कोठारी, संचालक इको व्हिलेज वेल्हा, बांबू उत्पादक गजानन कोकाटे, संपत शेंडकर, नितीन शेंडकर व बांबू उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

बांबू उत्पादक शेतकऱ्यांचा बांबू हा काड्या व पाल्यासह हमीभावाने तोरणा ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीमार्फत संधी बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या खरीदार कंपनीला पुरवठा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बांधावर सरासरी २ रुपये ७० पैसे प्रति किलो या हमीभावाने खरेदी दर देण्यात येणार आहे.

बांबू तोडणी, भराई व वाहतूक याचा अतिरिक्त खर्च खरेदीदार कंपनीकडून करण्यात येणार आहे. या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत. दररोज साधारण २० टन बांबू खरेदीचा करार करण्यात आला आहे. प्रचलित बांबू विक्रीपेक्षा वजनाप्रमाणे साधारण दुप्पट पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. हा अभिनव उपक्रम वेल्हे तालुक्यामध्ये प्रथमच राबविला जात आहे.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असून, आपल्या उत्पादनाला चांगला दर मिळून जास्तीचे पैसे मिळतील. तसेच पाल्यासह बांबूच्या काड्या व शेंडा या भागांना देखील एकच दर मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सदरच्या कच्च्या बांबूपासून बांबूचे पॅलेट तयार करण्यात येणार असून, याचा उपयोग जैविक इंधन म्हणून करण्यात येणार असल्याची माहिती तोरणा ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष श्रीरंग चोरघे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT