Raghunath Dada Patil Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Production Cost : शेतकऱ्यांनी पिकांच्या उत्पादन खर्चाची माहिती कळवावी

विविध शेतीमाल उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेती करताना प्रतिक्विंटल किती उत्पादन खर्च येतो, याची माहिती भारतीय किसान संघ - परिसंघ ‘सिफा’ला सादर करावी, असे आवाहन ‘सिफा’चे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले.

Team Agrowon

Raghunath Dada Patil पुणे ः केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी मूल्य आयोगाची (Agriculture Value Commission) बैठक २२ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे होत आहे.

या बैठकीत विविध शेतीमाल उत्पादन (Agriculture Production) घेणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेती करताना प्रतिक्विंटल किती उत्पादन खर्च येतो, याची माहिती भारतीय किसान संघ - परिसंघ ‘सिफा’ला सादर करावी, असे आवाहन ‘सिफा’चे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील (Raghunath Dada Patil) यांनी केले.

पाटील म्हणाले, ‘‘दिवसेंदिवस इंधनासह कृषी निविष्ठांच्या दरांबरोबरच महामागाईचा आलेख झपाट्याने वाढत असताना, शेतकरी आत्महत्या देखील वाढत आहेत. मात्र कृषी मूल्य आयोग विविध कृषी उत्पादनांच्या दरामध्ये अत्यल्प वाढ करत आहे.

हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य दाम मिळण्यासाठी उत्पादन खर्च केंद्र सरकारला देण्याची गरज आहे. याबाबत ही बैठक होत आहे.’’

‘‘देशभरातील शेतकऱ्यांकडून आणि विविध संघटनांकडून विविध पिकांच्या उत्पादन खर्चाची आकडेवारी बैठकीमध्ये सादर करण्यात येईल.

तरी शेतकऱ्यांनी आपण करत असलेल्या वेगवेगळ्या पिकांचा प्रतिक्विंटल उत्पादन खर्च ९४२२४०६१८८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर व rdadapatil@gmail.com या इमेल आयडीवर २० फेब्रुवारीपर्यंत पाठवावा.

म्हणजे आपणास मिळत असलेला उत्पादन खर्च अधिक मिळण्यास मदत होईल. तसेच शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसून जाईल,’’ असे रघुनाथदादा यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या भावात सुधारणा,कापूस स्थिरवला,जिऱ्याला चांगला उठाव,मोहरी आवक मर्यादीत, कारले टिकून

Rajma Farming: राजमा पिकात अन्नद्रव्ये, पीक संरक्षणावर भर

Banana Research Centre: केळी संशोधन केंद्रात शिवार फेरी उपक्रम

AI In Farming: संरक्षित शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

Onion Cultivation: खानदेशात कांदा लागवड रखडली

SCROLL FOR NEXT