pomegranate Market  Agrowon
ताज्या बातम्या

Pomegranate Crop Insurance : डाळिंब पीकविम्यात शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना, (अंबिया बहार) २०२२-२३ या योजनेत डाळिंब पिकाचा समावेश आहे.

Team Agrowon

सांगली ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (Crop Insurance Scheme) पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (Fruit Crop Insurance), (अंबिया बहार) २०२२-२३ या योजनेत डाळिंब पिकाचा (Pomegranate Crop) समावेश आहे. या योजनेअंतर्गत अंबिया बहारमध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी यांना विमा बँकाकडे डाळिंब फळपिकासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत १४ जानेवारीपर्यंत आहे.

शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाचा विमा घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांनी केले. डाळिंब पीक विमा मुबईतील एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीमार्फत जिल्ह्यात करण्यात येत आहे. डाळिंब फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख ३० हजार रुपये आहे.

शेतकरी हिस्सा १३ हजार रुपये आहे. विमा संरक्षण कालावधी अवेळी पाऊस यासाठी १५ जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२३, जादा तापमान १५ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२३, जास्त पाऊस १ जून २०२३ ते ३१ जुलै २०२३ आहे. गारपीटसाठी विमा संरक्षित रक्कम ४३ हजार ३३३ रूपये असून विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा ६ हजार ५०० रुपये आहे. गारपीटसाठी ‍विमा संरक्षण कालावधी १ जानेवारी २०२३ ते ३० एप्रिल २०२३ आहे.

या योजनेमध्ये डाळिंब फळपिकासाठी अधिसूचित महसूल मंडळाची संख्या ३१ आहे. या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक आहे. त्यामुळे विमा घेण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बँक खाते असणाऱ्या जवळच्या प्राधिकृत बँका/प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था/संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधून कागदपत्रांसह वेळेत प्रस्ताव जमा करावेत.

तसेच बिगर कर्जदार फळपीक उत्पादक शेतकरी यांनी आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क करून सहभाग नोंदवावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही सूर्यवंशी यांनी केले.

आवश्‍यक कागदपत्रे ः

सातबारा, खाते उतारा

आधार कार्ड

बँक खात्याचे तपशील

घोषणापत्र

बागेबाबत छायाचित्र अक्षांश-रेखांश पत्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Protest : तात्काळ मदतीची मागणी! दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांचे उद्यापासून बेमुदत उपोषण

Soybean Seed Storage : सोयाबीन बियाणे सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Turmeric Crops : हळद उत्पादक शेतकरी हवालदिल! करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळद पीक आले अडचणीत

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

SCROLL FOR NEXT