Eknath Shinde
Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Eknath Shinde : सरकार पाठीशी, आत्महत्येचा विचार करू नका ः शिंदे

टीम ॲग्रोवन

मुंबई : ‘‘अतिवृष्टीमुळे नुकसान (Heavy Rain Crop Damage) झालेल्या शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या निकषापेक्षा जास्त मदत (Crop Damage Compensation) केली आहे. अडीच वर्षांपूर्वी जाहीर केलेली प्रोत्साहन अनुदान (Farmer Incentive Subsidy) रक्कम जाचक अटी काढून खात्यांवर जमा केली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा (Farmer Suicide) विचार मनात आणू नये,’’ असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.

मंत्रालयातील सातव्या मजल्यावर आयोजित महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ वितरण कार्यक्रमात बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री अतुल सावे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘राज्यात प्रथम युती सरकारने कर्जमाफी केली. दुसऱ्यांदा कर्जमाफी केली तेव्हा नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र, काहीच घडले नाही. दोन अडीच वर्षे शेतकरी आम्हाला विचारत होते की, पैसे कधी जमा होतील, मात्र, तसे काही घडत नव्हते.

एकनाथ शिंदे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर जाहीर केल्याप्रमाणे हे अनुदान जमा करत आहोत. याआधी राज्य सरकार पैसे देत होते. मात्र, शेतकऱ्यांना मिळण्यात त्रुटी होत्या. मात्र, आम्ही एकाचवेळी प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल अशी व्यवस्था केली आहे.’’ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधीक खातेदारांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. या वेळी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे आदी उपस्थित होते.

‘अडीच हजार कोटी रुपये जमा’

शिंदे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी, जीवन सुसह्य करण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले. प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा आणि त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. या योजनेंतर्गत १६ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. सध्या आधार प्रमाणीकरण केलेल्या सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर अडीच हजार कोटी रुपये जमा केले आहेत.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT