Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Power Supply : सुरळीत वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे शेवगावात धरणे

खरडगाव वीज उपकेंद्रातील आठ गावांना दुरुस्तीची अपूर्ण कामे व खंडित वीजपुरवठ्यामुळे रब्बी हंगामाला फटका बसणार आहे.

टीम ॲग्रोवन

शेवगाव, जि. नगर : खरडगाव वीज उपकेंद्रातील आठ गावांना दुरुस्तीची अपूर्ण कामे व खंडित वीजपुरवठ्यामुळे (Power Supply) रब्बी हंगामाला (Rabi Season) फटका बसणार आहे. वरूर, खरडगाव सालवडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १५) महावितरण (Mahavitaran) कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

महावितरणचे उपअभियंता एल. एम. लोहारे यांनी याची त्वरित दखल घेऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या वेळी शेतकऱ्यांनी दिला.

गेल्या पाच महिन्यांपासून खरडगाव वीज उपकेंद्रांच्या एका ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड आहे. त्यामुळे रब्बी पिके धोक्यात आली आहेत. या बाबत महावितरणचे उपअभियंता लोहारे यांना निवेदन देऊनही ट्रान्सफॉर्मर दुरुस्त झाला नाही. त्यामुळे वरूर येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी शेवगाव येथे धरणे आंदोलन केले.

विजवितरण विभागाचे अधिकारी म्हणाले की, खरडगाव येथील उपकेंद्रात दोन पैकी एका रोहित्रात बिघाड झाल्यामुळे सर्व भार एका रोहित्रावर आला. सध्या शेतीपंपाचा भार वाढल्याने अडचणी आहेत. रोहित्राच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. दोन दिवसांत ते बसविण्यात येईल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT