Farmer Protest  Agrowon
ताज्या बातम्या

Bogus Fertilizer : बनावट खतांमुळे नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

Farmer Protest : बनावट किंवा अयोग्य खतांमुळे कापूस पिकाचे नुकसान झाल्याने जामनेर तालुक्यातील विविध गावांमधील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी जामनेर शहरात उपोषण केले.

Team Agrowon

Jalgaon News : बनावट किंवा अयोग्य खतांमुळे कापूस पिकाचे नुकसान झाल्याने जामनेर तालुक्यातील विविध गावांमधील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी जामनेर शहरात उपोषण केले.

पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषिमंत्री यांच्यासमोर शेतकऱ्यांना तत्काळ मदत कशी देता येईल यावर चर्चा करून मार्ग काढण्यात येईल, असे आश्‍वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी तोंडापूर (ता. जामनेर) येथे दिले. यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

तोंडापूर (ता. जामनेर) येथे एका कंपनीच्या खत वापराने कापसासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले. सर्वपक्षीय नेत्यांनी उपोषणाला पाठिंबा देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.

जे. के. चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, डिगंबर पाटील, नवलसिंग राजपूत चंद्रकांत बावस्कर, राजमल भागवत ज्ञानेश्‍वर पाटील, किशोर पाटील, हिरामण जोशी आदींनी उपोषणस्थळी भेट दिली.

तसेच शेतकऱ्यांना मागे घेण्याची विनंती केली. या वेळी जे. के. चव्हाण यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याशी मोबाइलद्वारे संवाद साधला. उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी देखील महाजन यांच्याशी संवाद साधला. आणि हे उपोषण मागे घेण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT