Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : सिंदखेडराजात चार मंडलातील शेतकरी मदतीपासून वंचित

नुकसान होऊनही या तालुक्यातील मलकापूर पांग्रा, दुसरबीड, किनगाव राजा आणि सोनोशी महसूल मंडलांत अतिवृष्टीसदृष्य पाऊस झाला नाही, अशी शासन दरबारी नोंद झाली.

Team Agrowon

सिंदखेडराजा, जि. बुलडाणा : नुकसान (Crop Damage) होऊनही या तालुक्यातील मलकापूर पांग्रा, दुसरबीड, किनगाव राजा आणि सोनोशी महसूल मंडलांत अतिवृष्टीसदृष्य पाऊस (Heavy Rain) झाला नाही, अशी शासन दरबारी नोंद झाली. त्यामुळे ही चारीही महसूल मंडले शासनाच्या मदतीच्या (Crop Damage Compensation) यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मंडळातील शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

सिंदखेडराजा तालुक्यात असलेल्या सर्वच महसूल मंडलांमध्ये यावर्षी पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते. सोंगणीसाठी आलेल्या सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला. सोंगणी केलेले सोयाबीन भिजले तर तर शेतात उभे असलेल्या सोयाबीनलाही कोंब फुटले होते.

कपाशी पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटले. खरिपातील सोयाबीन, कपाशी या प्रमुख पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान झेलावे लागले. सततच्या पावसामुळे सोयाबीन काळे पडले आहे. बाजारात हे सोयाबीन चार हजार रुपयांनीही विकत घ्यायला व्यापारी मागेपुढे करीत आहेत.

शेतकऱ्यांना लागवडीसाठी लागलेला खर्चसुद्धा निघालेला नाही. अशा परिस्थितीत शासनाकडून सिंदखेडराजा तालुक्यात असलेल्या महसूल मंडलांपैकी काही मंडलांतील शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, तर मलकापूरपांग्रा, दुसरबीड, किनगाव राजा आणि सोनोशी मंडलांतील शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे.

सत्ताधारी पक्षाचेच आंदोलन बेदखल

सततच्या पावसाने दुसरबीड, किनगावराजा आणि सोनोशी महसूल मंडळात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांना सरसकट मदतीच्या मागणीसाठी भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांच्या नेतृत्वात काही दिवसापूर्वी आंदोलन करण्यात झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT