Agriculture Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : मोहोळला मिळाले सहा ट्रान्स्फॉर्मर, शेतकऱ्यांची झाली सोय

मोहोळजवळील विविध सहा वस्त्यांसाठी जिल्हा नियोजन योजने (डीपीडीसी) अंतर्गत सहा ट्रान्स्फॉर्मर मंजूर झाले असून, त्यापैकी एका ट्रान्स्फॉर्मरचे काम पूर्ण झाले आहे.

Team Agrowon

Agriculture Electricity News मोहोळ, जि. सोलापूर ः मोहोळजवळील विविध सहा वस्त्यांसाठी जिल्हा नियोजन योजने (डीपीडीसी) अंतर्गत सहा ट्रान्स्फॉर्मर (Transformer) मंजूर झाले असून, त्यापैकी एका ट्रान्स्फॉर्मरचे (Agriculture Elctricity) काम पूर्ण झाले आहे.

त्याचे उद्‍घाटन काळे वस्तीवरील ज्येष्ठ नागरिक ब्रह्मदेव गायकवाड यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या सर्व ट्रान्स्फार्मरमुळे या परिसरातील सुमारे दोनशे शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे.

भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सतीश काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळजवळील काळे वस्ती, जाधव वस्ती, कवठे मरकुरी वस्ती, राऊत वस्ती, गायकवाड व सुतार वस्ती, शिंदे वस्ती, कुरडे वस्ती या ठिकाणच्या शेतकऱ्यांना विजेच्या समस्यांना गेल्या अनेक दिवसांपासून तोंड द्यावे लागत होते.

ट्रान्स्फॉर्मर जळणे, विद्युत पंप जळणे, कमी दाबाने वीज मिळणे या समस्या नित्याच्याच होत्या. अगोदरच्या ट्रान्स्फॉर्मरवर जादा ताण असल्याने तोही जळत होता. या भागातील शेतकऱ्यांनी नवीन ट्रान्स्फॉर्मरची मागणी काळे यांच्याकडे केली होती.

काळे यांनी वरील सहा ट्रान्स्फार्मरचे प्रस्ताव तयार करून महावितरणकडे दाखल केले होते. दरम्यान, आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्फत काळे यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आणि सहा ट्रान्स्फॉर्मर मंजूर झाले.

त्यामुळे खंडित वीजपुरवठा व अन्य अडचणींपासून या भागातील शेतकऱ्यांची सुटका झाली. यावेळी धोंडीबा गायकवाड, सुरेश राऊत, सागर देवकर, शाहू धोत्रे, सचिन काळे, किरण देशमुख, बाळू देशमुख, गणेश काळे, योगेश काळे, शीतल देशमुख उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT