Elephant Rampage Agrowon
ताज्या बातम्या

Wild Animal Crop Damage : ‘हत्ती हटाव’करिता शेतकऱ्यांचे उपोषण

या हत्तींमुळे या भागातील शेती, बागायती टिकविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यासमोर आहे.

Team Agrowon

Sindhudurg News ः शेती, बागायतीचे सतत नुकसान (Crop Damage) करणाऱ्या हत्तींचा बंदोबस्त (Elephant Rampage) करण्याबाबत वन विभाग (Forest Department) आणि शासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे तिलारी खोरे समितीने १ एप्रिलपासून दोडामार्ग वन विभाग कार्यालयासमोर शेतकरी उपोषणास (Farmer Protest) बसणार असल्याचा इशारा दिला आहे.

तिलारी खोऱ्यातील मांगेली, हेळवो, तेरवण-मेढे, घोटगेवाडी, मोर्ले, केर, भेकुर्ली, वीजघर यासह विविध गावांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रानटी हत्तींचा वावर आहे. या हत्तींमुळे या भागातील शेती, बागायती टिकविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यासमोर आहे. काही वर्षांपूर्वी ‘हत्ती हटाव’ मोहीम राबविण्यात आली होती.

परंतु त्यानंतरदेखील तो प्रश्न सुटलेला नाही. त्यानंतरच्या काळात हत्तीच्या मार्गावर खंदक खोदणे, सौर कुंपण उभारणे, मिरचीपूड, दोरखंड, अग्निबाण, फटाके असे उपाय राबविण्यात आले. मात्र या सर्व उपाययोजना कुचकामी ठरलेल्या आहेत.

त्यामुळे आता या भागातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ३ मार्चला हत्तींच्या उपद्रवामुळे त्रस्त गावातील शेतकऱ्यांची बैठक झाली होती. ३१ मार्चपूर्वी वन विभागाने हत्तीप्रश्नी निर्णय घ्यावा अन्यथा १ एप्रिलला वन विभाग कार्यालयासमोर उपोषण करण्याचे जाहीर केले होते.

दरम्यान आता तिलारी खोरे समितीने अधिकृतपणे १ एप्रिलपासून दोडामार्ग कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. या वेळी प्रेमानंद देसाई, तेजस देसाई, प्रवीण गवस, सोनाली गवस, साक्षी देसाई, समीर देसाई आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT