Onion Rate  Agrowon
ताज्या बातम्या

Onion Rate : कांद्याचे पैसे मिळाले नसल्याची शेतकऱ्याची तक्रार

अकोला ः येथील बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातंर्गत कार्यरत असलेल्या एका अडत्याने निमकर्दा व इतर गावांमध्ये कांदा खरेदी केली. मात्र, त्याचे चुकारे दिले नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार दिली आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः येथील बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातंर्गत कार्यरत असलेल्या एका अडत्याने निमकर्दा व इतर गावांमध्ये कांदा खरेदी (Onion Procurement) केली. मात्र, त्याचे चुकारे (Onion Payment) दिले नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार दिली आहे.

येथील बाजार समितीतील परवाना असलेल्या एका खरेदीदाराने निमकर्दा (टाकळी) व परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला होता. हा व्यवहार करताना काहींना नगदी, तर काहींना धनादेश दिले गेले. मात्र, यापैकी काही शेतकऱ्यांचा धनादेश

बँकेत वठला नाही. आता चुकारे मागणाऱ्यांना योग्य प्रतिसाद मिळत नाही. याबाबत शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाला १० ऑगस्टला तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे. चुकारे मिळण्यासाठी व कारवाईसाठी २१ सप्टेंबर०दिला आहे.

बाजार समितीने दिली परवाना रद्दची नोटीस

संबंधित विक्रेत्याला बाजार समितीने पत्र देत खुलासा मागितला आहे. याबाबत पत्रात म्हटले, की कांदा खरेदी रकमेदाखल धनादेश दिलेला असून, तो बाउंस झालेला आहे. अद्यापपर्यंत रक्कम अदा न करणे ही बाब बाजार समिती परवान्याचे तसेच बाजार समिती सोबत करून दिलेल्या अडत परवाना करारनाम्याचे उल्लंघन करणारी बाब असल्याने परवाना रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT